
रत्नागिरी ः ...बरे झालेल्या 20 रुग्णांचे डोळे नातेवाइकांच्या वाटेवर
टु १
..
काल फोटो सोडला
-rat२०p१३.jpg
37391
रत्नागिरीः रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय
------------
२० मनोरूग्ण झाले बरे मात्र नातेवाईकांची प्रतीक्षाच
पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर; मनोरुग्णालयात दाखल २००, हक्काचं घर मिळण्याची आशा
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकूण २०० रुग्णांपैकी २० रुग्ण बरे झाले आहेत; मात्र त्यांचे नातेवाईक नेत नसल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. नातेवाइकांचा शोध सुरू असला तरी या रुग्णांना पोरकेपणाची भावना खात आहे. कोणीतरी आपल्याला न्यायला येईल, हक्काचं घर मिळेल, नातेवाइकांच्या प्रेमाची ऊब मिळेल, या भाबड्या आशेपोटी ते वाटेला डोळे लावून आहेत.
रत्नागिरी प्रादेशिक रुग्णालय हे सांगली, कोल्हापूर, मिरज, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये रुग्णालयात रुग्णांची संख्या बेताची होती; मात्र आता कोरोनानंतर सर्व निर्बंध उठल्यावर मनोरुग्ण दाखल करण्याची संख्या वाढली आहे. रुग्णालयात सध्या २०० मनोरुग्ण आहे. त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून योग्य निगा राखली जात आहे; मात्र अनेक नातेवाईक रुग्णांना दाखल करतात आणि खोटे पत्ते देऊन जातात. रुग्ण उपचारानंतर बरा झाला तरी तो पुन्हा आपल्या कुटुंबात जाण्याचा मार्ग खडतर होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.
तप झाले तरी कुटुंबाच्या मायेला पारखे झालेल्या आणि समाजात मुक्तपणे विहार करण्यासाठी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील २० मनोरुग्ण बरे झाले आहेत. नातेवाईक येण्यासाठी वाटेला डोळे लावून आहेत; मात्र अनेकांची ओळखच पटलेली नाही. ज्याची ओळख पटली आहे, त्याचे नातेवाईकच आलेले नाहीत. नातेवाईक शोधणे सोपे जावे, याकरिता अनेक उपाय काढण्यात आले. पोलिसांसह विधी प्राधिकरणाकडे या रुग्णांची यादी देण्याचा निर्णय झाला. नातेवाइकांचा शोध सुरू असला तरी यांचे नातेवाईक अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे मनोरुग्णालयातील बरे झालेल्या २० रुग्णांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानसिक आरोग्य कायदा २०१७ या कायद्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचे समुपदेशन आणि पुनर्वसन करणे आवश्यक आहे; मात्र समुपदेशन होते, पुनर्वसन होत नाही, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
----------
कोट...
मनोरुग्णालयातील अनेक २० रुग्ण बरे झाले आहेत; मात्र त्यांचे नातेवाईक त्यांना नेत नसल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. नातेवाइकांचा शोध सुरू आहे; परंतु आम्ही बऱ्या झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहोत.
- डॉ. अमोद गडीकर, मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79243 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..