चिपळूण ः निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः निधन
चिपळूण ः निधन

चिपळूण ः निधन

sakal_logo
By

ratchl२०१.jpg
37298
- बबनराव पालांडे
--------------
बबनराव पालांडे यांचे निधन
चिपळूण ः खेड तालुक्यातील धामणंद येथील हभप बबनराव बजाजीराव पालांडे (९०) यांचे १५ जुलैला आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे २ मुलगे, १ मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विशेष म्हणजे पालांडे यांचे सर्व नातू सैन्यदलाच्या सेवेत आहेत. (कै.) बबनराव पालांडे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून धामणंद परिसरातील पंधरागाव परिसरात परिचित होते. धामणंद येथील विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांनी उकृष्ट प्रगतशील शेतकरी म्हणून लौकिक मिळवला होता.
---------
-rat२०p५.jpg
37305
- भास्कर मालशे
----------
भास्कर मालशे यांचे निधन
चिपळूण : बुरंबाड येथील भास्कर विठ्ठल तथा दादा मालशे (वय ९२) यांचे १७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी रेल्वे खात्यामध्ये बराच काळ नोकरी केली. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्यावर चिपळुणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
-------
-rat२०p६.jpg
L37316
- शुभदा तेरेदेसाई
------------
शुभदा तेरेदेसाई यांचे निधन
रत्नागिरी : बंदररोड येथील रहिवासी शुभदा शरद तेरेदेसाई (वय ७०) यांचे १९ जुलैला मध्यरात्री किरकोळ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुरुगवाडा येथील भागोजीशेठ कीर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकमान्य टी. डेपो दुकानाचे मालक शरद तेरेदेसाई यांची पत्नी आणि इलेक्ट्रिशियन प्रमोद तेरेदेसाई यांच्या त्या मातोश्री. बंदररोड गणेशोत्सव मित्रमंडळात त्या नेहमीच योगदान देत होत्या. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सूना, नातवंडे, दीर, पुतण्या असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79249 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top