
कणकवलीत रंगले सराव शिबिर
37445
कणकवली ः फ्लोरेट कॉलेजच्या शिबिरात सहभागी अभिनेत्री अक्षता कांबळी, रविकिरण शिरलकर आदी.
कणकवलीत रंगले सराव शिबिर
तळेरे ः कणकवली येथील फ्लोरेट कॉलेज इंटोरियल आणि फॅशन डिझायनिंग या कॉलेजतर्फे मुलांच्या सरावासाठी दहा दिवसांचे शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. अभिनेत्री अक्षता कांबळी आणि आर. शिरवलकर फिल्म प्रोडक्शनचे मालक आर्ट डिरेक्टर रविकिरण शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराची सांगता झाली. यावेळी कांबळी यांनी मार्गदर्शन केले. कणकवलीसारख्या शहरात अशा प्रकारचे कॉलेज सुरू करून सचिन बोराटे व सार्था कदम यांनी खूप मोठी गोष्ट साकार केली आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन आर्थिक भार सोसत शिकण्यापेक्षा कोकणात कुटुंबासोबत शिकून मुंबईत नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थांना सुवर्णसंधी आहे. त्या कॉलेजचे ‘शिका कोकणात, कमवा मुंबईत’ हे ब्रीदवाक्य कौतुकास्पद आहे.’’ श्री. शिरवलकर यांनी आर्ट विषयी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी या वर्कशॉपच्या शिक्षिका सौ. कामत, तळवडेकर, प्रियंका नलावडे तसेच या कॉलेजच्या हेड सार्था कदम, कर्मचारी मनीषा देसाई, शिवानी डिचोलकर उपस्थित होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79250 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..