मिठमुंबरी नं. १ शाळेत भरला गावठी बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठमुंबरी नं. १ शाळेत भरला गावठी बाजार
मिठमुंबरी नं. १ शाळेत भरला गावठी बाजार

मिठमुंबरी नं. १ शाळेत भरला गावठी बाजार

sakal_logo
By

37444
मिठमुंबरी ः येथे भरवलेला गावठी बाजार.

मिठमुंबरी नं. १ शाळेत
भरला गावठी बाजार
देवगड ः मिठमुंबरी (ता. देवगड) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा मिठमुंबरी नं. १ तसेच महिला बचतगट ग्रामसंघाच्या संयुक्त विद्यमाने मिठमुंबरी शाळेच्या आवारात गावठी बाजाराचे आयोजन केले होते. या बाजाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्या, गावठी भाजी, खाडीतील मुळे, खेकडे विक्रीसाठी ठेवले. देवगड शहरातील ग्राहकही खरेदीसाठी उपस्थित होते. सरपंच रिमा मुंबरकर, सदस्य दक्षता मुंबरकर, ग्रामसेवक रेश्मा गोवळकर, शाळा समितीचे अध्यक्ष हेमंत तोडणकर, उपाध्यक्ष शिल्पा गावकर, सदस्य नाना गावकर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, नंदकिशोर मांजरेकर, रमेश चव्हाण, आनंद लाड, सचिन जाधव, आरेश भोसले, केंद्रप्रमुख भाग्यश्री जोईल, स्नेहा जगताप, मुख्याध्यापक मधुसूदन घोडे, सुरेश साळुंके, किशोर चव्हाण, शशिकांत बिराजदार, बचतगटाच्या सोनाली गावकर, अंगणवाडी सेविका सखुबाई गावकर, रवीना मुंबरकर आदी उपस्थित होते. यावेळी सचिन जाधव, नाना गावकर यांनी मार्गदर्शन केले. श्री. घोडे यांनी स्वागत केले. दरम्यान, बाजारात विद्यार्थ्यांनी सुमारे चार हजार रुपयांची आर्थिक कमाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79258 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top