दाभोळ ः परशुराम घाटामुळे सीएनजीचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः परशुराम घाटामुळे सीएनजीचा तुटवडा
दाभोळ ः परशुराम घाटामुळे सीएनजीचा तुटवडा

दाभोळ ः परशुराम घाटामुळे सीएनजीचा तुटवडा

sakal_logo
By

-rat20p24.jpg
L37452
- दापोली ः सीएनजी तुटवड्यामुळे सीएनजी पंपावर लागलेली वाहनांची रांग.
-----------
सीएनजीचा तुटवडा; रिक्षाचालकांचा धंदा बुडाला

परशुराम घाटामुळे वाहतूक नियंत्रित; रांगेतच जातोय वेळ
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २० ः पेट्रोल व डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने अनेकांनी सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी केली आहेत; मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहतूक नियंत्रित केली असल्याने दापोली शहरात दिवसाला सीएनजीच्या येणाऱ्‍या दोन गाड्या न येता केवळ एकच गाडी येत असल्याने शहरातील वाहनांना पुरेसा सीएनजी मिळत नाही. सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लावावी लागत असल्याने चालकांचा वेळ फुकट जात आहे.
दापोली शहरात चारचाकी, तीनचाकी गाड्या सीएनजीवर केल्या असून पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणात सीएनजीच्या गाड्या दापोलीत घेऊन येतात. शहरात ९० टक्के रिक्षा सीएनजीवर आहेत. दापोली-दाभोळ मार्गावर दापोली शहरात एकच सीएनजी पंप आहे. त्यामुळे या पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागते. दापोलीसाठी दोन गाड्या सीएनजी येत होता; मात्र परशुराम घाटातील वाहतूक नियंत्रित केल्याने केवळ एकच गाडी सीएनजी येत असल्याने वाहने जास्त सीएनजी कमी अशी स्थिती निर्माण होते. अनेक वाहने रांगेत असली तरी सर्व सीएनजी मिळत नाही. त्यामुळे जास्त हाल रिक्षाचालकांचे होत आहेत. त्यांना संपूर्ण दिवस रांगेत उभे राहिले तर सीएनजी मिळतो. त्यामुळे त्यांचा एक दिवसाआड व्यवसाय होतो.सीएनजी पुरवठा करणारी कंपनी एकच असून, परशुराम घाटातील वाहतुकीमुळे अडचणी निर्माण झालेल्या असल्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले.
-----
कोट
दापोली शहरातील सीएनजी पंपात एक दिवस जरी सीएनजी भरून येणारी गाडी उशिरा आली तर त्याचा परिणाम वाहनचालकांना भोगावा लागतो. दिवसभर रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे धंदा बुडतो. यावर उपाय म्हणून काही रिक्षाचालक सीएनजीचा नाद सोडतात व पेट्रोल भरून रिक्षा चालवतात. जर दररोज सीएनजीची गाडी आली तर तासाभरात सीएनजी भरून मिळतो.
- संदीप महाजन, रिक्षाचालक, दापोली
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79264 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top