खेड ः शासकीय निधीचा अपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः शासकीय निधीचा अपहार
खेड ः शासकीय निधीचा अपहार

खेड ः शासकीय निधीचा अपहार

sakal_logo
By

२८ लाखांच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकाला अटक
खेड, ता. २० : तालुक्यातील शिंगरी व किंजळेतर्फे नातू या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झालेल्या २८ लाख ७ हजार ३७३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी या ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक पोपट कुसुम भोरजे यांना १९ जुलैला अटक करण्यात आली आहे. त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या अपहार प्रकरणाची फिर्याद ग्रामविस्तार अधिकारी शरद साहेबराव भांड यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली होती. २०१५ ते २०१७ या कालावधीत प्राप्त झालेल्या २८ लाख ७ हजार ३७३ रु. शासकीय निधीचा वापर गावच्या विकासासाठी न करता त्यानी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाल्याने या ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक भोरजे यांना अटक होऊन आता पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे अधिक तपास करत आहेत.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79279 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top