राजापूर ः ओबीसींच्या राजकीय भवितव्यावरील अरिष्ट दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः ओबीसींच्या राजकीय भवितव्यावरील अरिष्ट दूर
राजापूर ः ओबीसींच्या राजकीय भवितव्यावरील अरिष्ट दूर

राजापूर ः ओबीसींच्या राजकीय भवितव्यावरील अरिष्ट दूर

sakal_logo
By

ओबीसींच्या राजकीय भवितव्यावरील अरिष्ट दूर

आरक्षण देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे बावकरांकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः ''आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींच्या राजकीय भवितव्यावरील अरिष्ट दूर झाले आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो'', अशा शब्दामध्ये ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील ओबीसी समाजाच्या नियमित असलेल्या राजकीय आरक्षणाला शासनाने स्थगिती दिली होती. त्याचा फटका ओबीसी समाजाला विविध निवडणुकांमध्ये बसणार असल्याने रद्द करण्यात आलेले ओबीसी आरक्षण मिळावे, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील ओबीसी बांधवांतर्फे केली जात होती. त्यासाठी ठिकठिकाणी मोर्चाही काढताना शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसी बांधवांना आरक्षण राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष शेंडगे आणि कार्याध्यक्ष बावकर यांनी स्वागत केले आहे.
ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षात तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर बैठका, धरणे, निषेध नोंदवणे, मोर्चे आदी स्वरूपाची आंदोलने करून सरकारवर जो दबाव निर्माण केला, त्याचेच हे फलित आहे. संघटनेच्या सर्व ओबीसी बंधू-भगिनींना या यशाचे श्रेय जाते. आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन!
...
चौकट
मोठी लढाई बाकी..
ते पुढे म्हणाले, ही लढाई आपण जिंकलो असलो तरी सर्वात मोठी लढाई बाकी आहे. जातनिहाय जनगणना केंद्र सरकारकडून झाली पाहिजे किंवा त्यांनी न केल्यास राज्यपातळीवर झाली पाहिजे. त्याशिवाय ओबीसींची खरी लोकसंख्या कळणार नाही. यासाठी साऱ्‍यांनी लढायला सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी ओबीसी समाजबांधवांना केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79283 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top