विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन
विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन

विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

37417
कणकवली ः विद्यांजली पोर्टलबद्दल माहिती देताना गटशिक्षणाधिकारी किशोर गवस.

विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन
तळेरे ः गटसाधन केंद्र, कणकवली येथे ‘विद्यांजली २.०’ संदर्भातील कार्यशाळा झाली. ‘एनईपी २०२०’ मधील लक्ष्यसाध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभाग व खासगी क्षेत्राचा सहभाग घेऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी हे पोर्टल अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख विजय मसुरकर, विषयतज्ज्ञ प्रणाली सावंत, स्नेहा सावंत, तज्ज्ञ मार्गदर्शक विशाल हडकर, आनंद तांबे आदी उपस्थित होते. या पोर्टलवर जिल्हा परिषद शाळा व खासगी अनुदानित शाळांना नोंदणी करून शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून घेणे शक्य झाले आहे. याबाबत प्रणाली सावंत यांनी माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याबाबत श्री. हडकर व श्री. तांबे यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी गवस यांनी या उपक्रमासाठी सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
-----------
जबलपूर - कोईम्बतूर जादा रेल्वे
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर जबलपूर ते कोईम्बतूर, अशी जादा गाडी पश्चिम मध्य रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहे. ही गाडी ५ आॅगस्ट ते ३ आॅक्टोंबर दरम्यान धावेल. गाडी क्रमांक ०२१९८ जबलपूर जंक्शन येथून ५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान दर शुक्रवारी रात्री साडेअकराला सुटेल. ही गाडी कोईम्बतूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाचला पोहचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०२१९७ कोईम्बतूर जंक्शन येथून ८ आॅगस्ट ते ३ आॅक्टोबरपर्यंत दर सोमवारी दुपारी पावणे चारला सुटून जबलपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊला पोहचेल. ही गाडी नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन, नाशिकरोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवी, मडगाव, कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरु, कासारगोड, कन्नूर, कोळीकोन, आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79300 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..