
विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन
३७४१७
कणकवली ः विद्यांजली पोर्टलबद्दल माहिती देताना गटशिक्षणाधिकारी किशोर गवस.
विद्यांजली पोर्टलबाबत मार्गदर्शन
तळेरे ः गटसाधन केंद्र, कणकवली येथे ‘विद्यांजली २.०’ संदर्भातील कार्यशाळा झाली. ‘एनईपी २०२०’ मधील लक्ष्यसाध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभाग व खासगी क्षेत्राचा सहभाग घेऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी हे पोर्टल अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख विजय मसुरकर, विषयतज्ज्ञ प्रणाली सावंत, स्नेहा सावंत, तज्ज्ञ मार्गदर्शक विशाल हडकर, आनंद तांबे आदी उपस्थित होते. या पोर्टलवर जिल्हा परिषद शाळा व खासगी अनुदानित शाळांना नोंदणी करून शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून घेणे शक्य झाले आहे. याबाबत प्रणाली सावंत यांनी माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याबाबत श्री. हडकर व श्री. तांबे यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी गवस यांनी या उपक्रमासाठी सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79351 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..