रेडी, शिरोड्यात बंधाऱ्यासाठी पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडी, शिरोड्यात बंधाऱ्यासाठी पाहणी
रेडी, शिरोड्यात बंधाऱ्यासाठी पाहणी

रेडी, शिरोड्यात बंधाऱ्यासाठी पाहणी

sakal_logo
By

swt214.jpg
37551
वेंगुर्लेः पाहणीदरम्यान उपस्थित प्रीतेश राऊळ, रामसिंग राणे व ग्रामस्थ.

रेडी, शिरोड्यात बंधाऱ्यासाठी पाहणी
पत्तनचे अधिकारी ः जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २१ः रेडी-यशवंतगड व शिरोडा वेळागर येथे बंधारा मागणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २०) अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार रेडी यशवंतगड ते सिद्धेश्वर मंदिर समुद्र किनारी पत्तनचे डेप्युटी कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण, श्री. गावडे तसेच तलाठी यांनी पाहणी केली.
रेडी यशवंतगडनजीक समुद्र किनाऱ्यावर बंधारा नसल्यामुळे किनाऱ्यावरील तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. तर शिरोडा वेळागर येथे बंधारा नसल्याने समुद्राचे पाणी पावसात पूर्ण वस्तीत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत दोन्ही ठिकाणांची तत्काळ पाहणी करून कार्यवाही करावी, असे निवेदन जिल्हा परिषद माजी सदस्य प्रीतेश राऊळ व शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी महसूल अधिकारी व पत्तन विभागाने त्याठिकाणी जाऊन वस्तुस्थितीची संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी केली.
जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नामदेव राणे, ग्रामपंचायत सदस्य गायत्री सातोस्कर, शैलेश तिवरेकर, माजी पंचायत समिती सभापती अश्विनी सातोस्कर, लगतचे जमीनदार नितीन सावंत, सीताराम राणे, बाबाजी राणे, रोहित गवंडी, सातोस्कर परिवार, महेश सावंत, अक्षय सावंत उपस्थित होते. तसेच शिरोडा-वेळागर येथे पाहणी करताना शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, स्थानिक जमीनदार अमारे, भगत, शिरोडा ग्रामस्थ उपस्थित होते.
हा पूर्ण अहवाल मुख्य अभियंता पत्तन विभाग यांना सादर करून येणाऱ्या बजेटला मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गेली दोन वर्षे आम्ही पाठपुरावा करतो; पण काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आंदोलनाची भूमिका शिरोडा, रेडीतील ग्रामस्थांनी घेतली आहे. बंधाऱ्याअभावी पूर्ण बागायती नष्ट झाली असून, विजेचे पोल पडले आहेत. जमिनीचीही धूप झाली आहे. समुद्र घरापर्यंत येण्याची भीती निर्माण झाली आहे. तातडीने बंधारा न झाल्यास समुद्राचे पाणी शेतीत घुसणार आहे. यशवंतगडाच्या तटाचेही नुकसान झाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79436 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..