
हुमरमळावासीयांची एकजूट कौतुकास्पद
swt215.jpg
37552
हुमरमळाः विद्यार्थी गुणगौरव प्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. दाभाडे, अतुल बंगे, अर्चना बंगे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
हुमरमळावासीयांची एकजूट कौतुकास्पद
डॉ. राजेंद्र दाभाडेः ग्रामपंचायतीतर्फे गुणवंत विद्यार्थी, महिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः हुमरमळा गावातील नागरिक सुशिक्षित व सुज्ञ आहेत. त्यांच्या एकजुटीमुळेच एक आदर्श गाव म्हणून कुडाळ तालुक्यामध्ये हे गाव आपली परंपरा टिकवून आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी गुणवंत विद्यार्थी व महिला गुणगौरव कार्यक्रमात केले.
हुमरमळा ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी व बारावी शालांत परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या तसेच बचतगटाच्या माध्यमातून कुटुंबाची उन्नती साधणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे याना निमंत्रित केले होते. बचतगटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती साधली जाते व ती महिला सक्षमपणे कुटुंबाची जबाबदारी पार पाडते. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सन्मान दिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे मुलांचा गुणगौरव झाल्यास भविष्यात चांगले विद्यार्थी घडतात. गावातील नागरिकांनी सहकार्याची भावना कायम ठेवल्याने तसेच अर्चना बंगेंसारख्या महिला सरपंचाच्या पाठीशी ठामपणे राहिल्यानेच हुमरमळा ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार मिळविले, असे विचार डॉ. दाभाडे यांनी व्यक्त केले. यापुढेही अनेकानेक पुरस्कार या ग्रामपंचायतीला मिळून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.
माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेविका अपर्णा पाटील यांचा पोलिस अधीक्षक डॉ. दाभाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सरपंच सौ. अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत, निवती पोलिस निरीक्षक चिंदरकर, श्री. बगाडे, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई, रमा गाळवणकर, गिरिजा गुंजकर, शिल्पा मयेकर, पोलिस पाटील उमेश शृंगारे, माजी सरपंच प्रवीण मार्गी, मितेश वालावलकर, पप्पू दळवी, घनःशाम परकर, नंदू मार्गी, वैभव मांजरेकर, कृषी सेवक श्री. सुद्रिक, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश मयेकर, अमित बंगे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79438 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..