राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करा - एस. व्ही. हांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करा - एस. व्ही. हांडे
राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करा - एस. व्ही. हांडे

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करा - एस. व्ही. हांडे

sakal_logo
By

swt२१९.jpg
37605
सिंधुदुर्गनगरीः तिसऱ्या राष्ट्रीय अदालत नियोजनासाठी आयोजित बैठकीला उपस्थित न्यायाधीश एस. व्ही. हांडे, संग्राम देसाई व अन्य.

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करा
एस. व्ही. हांडे ः सिंधुदुर्गनगरीत नियोजनाच्या बैठकीत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः जिल्ह्यात १३ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त तडजोडपात्र प्रकरणे ठेवण्यात यावीत. यासाठी जिल्हा बार असोसिएशनने सहकार्य करून ही अदालत यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीत बोलताना केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी २०२२ या वर्षामध्ये ठरवून दिलेली तिसरी राष्ट्रीय लोकअदालत १३ ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील उभय पक्षकारांमध्ये सलोखा राहण्यासाठी, त्यांच्यात तडजोड घडवून निकाली काढण्यासाठी नुकतीच जिल्हा बार असोसिएशन सिंधुदुर्ग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा उपाध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ संग्राम देसाई, जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्ष राजेंद्र रावराणे, श्री. हांडे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश डी. बी. म्हालटकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती ए. बी. कुरणे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रथितयश विधीज्ञ उपस्थित होते.
ॲड. राजेंद्र रावराणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सभेबाबत माहिती दिली. न्यायाधीश श्री. हांडे म्हणाले, "१३ ऑगस्टला राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे व सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये भरवण्यात येत आहे. मागील ७ मेस झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित १७६ व वादपूर्व प्रकरणे १७२ अशी एकूण ३४८ प्रकरणे जिल्ह्यात निकाली झाली होती. यामध्ये सर्व विधीज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याने १३ ऑगस्टला होत असलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत सर्वांनी उत्स्फूर्तपणे तडजोड होणारी प्रकरणे ठेवण्यासाठी पक्षकारांना उद्युक्त करावे." यावेळी उपस्थित न्यायाधिशांनी त्यांच्या न्यायालयातील तडजोड होणाऱ्या प्रकरणांची माहिती दिली. जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्व विधीज्ञांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

चौकट
लोकअदालत ठरतेय प्रभावी
यावेळी सचिव डी. बी. म्हालटकर यांनी गेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २००४ मधील दिवाणी न्यायालयात दाखल केलेला दावा निकाली झाल्याने त्या निकालाविरोधात जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे नियमित अपील क्रमांक १९२/२०१५ चे चुलत भावांमध्ये दाखल होते. सर्व पक्षकार ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती होते. हे अपील सामंजस्याने तोडगा काढून निकाली काढण्यात आले. तसेच विशेष दरखास्त नंबर १६/२०१९ ही तडजोडीने निकाली काढली. जुनी प्रकरणे देखील तडजोडीने मार्गी लागत असून, हे या राष्ट्रीय लोकअदालतीचे यश असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79441 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top