रत्नागिरी ः वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद
रत्नागिरी ः वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद

रत्नागिरी ः वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद

sakal_logo
By

-rat21p5.jpg
L37580
-रत्नागिरी ः शिर्के प्रशालेत कान, नाक, घसा व डोळे तपासणी शिबिर झाले.
---------------
वात्सल्यसिंधू संस्थेचा
उपक्रम कौतुकास्पद ः चव्हाण
रत्नागिरी, ता. २१ ः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेने राबवलेला विद्यार्थ्यांच्या कान, नाक, घसा व डोळे तपासणी शिबिर हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत रा. भा. शिर्के प्रशालेचे उपमुख्याध्यापक रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्था, इन्फिगो आयकेअर सेंटर आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रा. भा. शिर्के प्रशालेत कान, नाक, घसा व डोळे तपासणी शिबिरावेळी ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन स्कूल कमिटीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सई धुरी, दंतचिकित्सक डॉ. श्रुती पाटणकर, संस्थाध्यक्ष अनिरुद्ध खामकर, शैलेश मुकादम, अरुण आडिवरेकर, दिव्यांशी रसाळ, अंजली सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्रीनिवास जोशी, प्रथमेश भागवत, संध्या बेटकर, इन्फिगोचे साहिल पीरखान, गणेश कांबळे, हिना चौधरी, तुषार केळकर आदी उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात बारावीच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी मुख्याध्यापक गायत्री गुळवणी, संस्थेचे पदाधिकारी बिपीन शिंदे, अनुराधा लेले, सारिका विलणकर, अभिजित विलणकर, विद्यार्थी अमेय सावंत, यश डोंगरे, आदित्य नार्वेकर, सोनम माळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79455 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top