रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

हेलियम संवर्धन काळाची गरज
रत्नागिरी ः येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे हेलियम संवर्धन दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर यांनी हेलियम संवर्धन दिवस व हेलियम दिन याबद्दल माहिती सांगितली. हेलियमचा शोध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर १८ ऑगस्ट १८६८ ला लागला. हेलियम संवर्धन दिवस जगभरात का साजरा करतात व या वायूचे संवर्धन का करावे व त्याचा उपयोग कुठे होतो, तेदेखील सांगितले. निबंध स्पर्धेत प्रथम नेहा शिंदे, द्वितीय बागेश्वरी रेड्डी, तृतीय ऋतुजा बेकवडकर यांनी यश मिळवले. त्यांना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, विज्ञान विभागप्रमुख वैभव घाणेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक दीपिका मयेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली जोशी यांनी केले. मिथिला वाडेकर यांनी आभार मानले.
-------------------
आडिवरेत रविवारी नेत्रतपासणी
राजापूर ः दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल व आडिवरे येथील ओम ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २४) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जि. प. मराठी शाळा, नवेदर, आडिवरे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तपासणीनंतर गरजू रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा मोफत सवलतीच्या दरात व दुर्बिणीद्वारे केली जाते. सवलतीच्या दरात चष्मे दिले जातील. अधिक माहितीसाठी भाई फणसे, प्रसन्न दाते यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन ओम ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र भोवड व सचिव बाळ दाते यांनी केले आहे.
---------
पटवर्धनमध्ये संस्कृत
विभागातर्फे कार्यक्रम
रत्नागिरी ः पटवर्धन हायस्कूलमध्ये संस्कृत विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित केला. मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, प्रमुख अतिथी विनायक पाथरे उपस्थित होते. विनायक पाथरे यांनी गुरू महात्म्य या विषयावर मार्गदर्शन केले. नववीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक संस्कृत विभागप्रमुख जयेश गुरव यांनी केले. या वेळी सेजल आलिम हिने नृत्य, स्वरांगी वहाळकर, खुशी हातखंबकर, सादिया सय्यद, क्रिश दुर्वे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्रिती केळकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन विश्वरी पवार या विद्यार्थीनीने केले. शिक्षिका सुनीता गाडगीळ यांनी आभार मानले.
----------------
कायदा, सुव्यवस्थेवर
जनजागृती
रत्नागिरी ः येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात अँटी रॅगिंग विभाग, शिस्त विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यमाने कायदा आणि सुव्यवस्था जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून ए. एन. कुलकर्णी, ॲड. अमित शिरगावकर, ॲड. स्मिता कांबळे उपस्थित होते. मान्यवरांनी मुलांचे अधिकार व शिक्षणाचे अधिकार, अँटी रॅगिंग, बेटी बचाओ बेटी पढाओ, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिस्त विभाग प्रमुख प्रा. सोनाली जोशी यांनी विद्यार्थ्यांकडून अँटी रॅगिंग संदर्भात प्रतिज्ञा म्हणवून घेतली. या प्रसंगी प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, अँटी रॅगिंग विभागप्रमुख प्रा. निलोफर बन्नीकोप, प्रा. ऋतुजा भोवड उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती कदम यांनी केले. प्रा. वैभव कीर यांनी आभार मानले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79466 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..