
सावंतवाडीत ओहोळात आढळले चणक मासे
swt२११२.jpg
37619
सावंतवाडीः आढळलेले चणक मासे. (छायाचित्रः निखिल माळकर)
सावंतवाडीत ओहोळात आढळले चणक मासे
तेरेखोल नदीपात्रातून आल्याचा दावा; तब्बल सात अन् पाच किलो वजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः येथील उपरलकर देवस्थान परिसरातील ओहोळात चक्क दोन चणक मासे आढळून आले. गिरगोल फेराव आणि सुनील इंगळे हे काल (ता. २०) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना ते सापडले. याबाबत अधिक माहिती अशी कीः श्री. फेराव आणि श्री. इंगळे हे चढणीचे मासे पकडण्यासाठी येथील उपरलकर देवस्थान परिसरातील ओहोळात गेले होते. यावेळी पाण्याच्या कमी प्रवाहात जायबंदी झालेले भलेमोठे दोन मासे त्यांच्या निदर्शनास पडले. दरम्यान त्यांनी त्या माशांना पकडून हॉटेल व्यावसायिक राजू भालेकर यांच्याकडे आणले. यावेळी श्री. भालेकर यांनी ते चणक मासे असल्याचे सांगितले. तब्बल सात आणि पाच किलो वजनाचे ते मासे आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीची पाणी पातळी वाढली होती. त्यातूनच ते भक्षाच्या शोधार्थ उलट दिशेने प्रवास करत या ठिकाणी पोहोचले असावेत. त्यांच्याच म्हणण्यानुसार चणक हा मासा प्रामुख्याने समुद्रात आढळत असला तरी तो गोड्या पाण्यात सुद्धा राहू शकतो. भक्षाच्या शोधार्थ तो कुठेही प्रवास करू शकतो, त्यामुळे हे मासे तेरेखोल नदीपात्रातूनच वर आले, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान पालिका प्रशासनाकडे याबाबत विचारले असता ते मासे तलावातील सुद्धा असू शकतात. तलावात विविध प्रकारच्या माशांची बीज सोडण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाचे पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्याच्या प्रवाहासोबत ते ओहोळात वाहून गेले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
-------------
कोट
‘‘ भक्ष्याच्या शोधार्थ हे मासे उलट दिशेने प्रवास करत तेरेखोल नदीपत्रातून आले असावेत आणि अचानक पाऊस गेल्यामुळे आणि पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने त्यांना माघारी परता आले नाही. त्यातच ते कमी पाण्यात जायबंदी झाले असावे.’’
- सागर पेडणेकर, मच्छीमार
-----------
‘‘पालिकेकडून तलावात मासे सोडण्यात येतात. मत्स्य बीज सोडताना त्यात हे मिक्स होवून आले असावेत आणि प्रवाहासोबत वाहून ओहोळात गेले असावेत.’’
- डुमिंग अल्मेडा, आरोग्य अधिकारी, सावंतवाडी पालिका
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79482 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..