342 गावांत होणार कापणी प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

342 गावांत होणार कापणी प्रयोग
342 गावांत होणार कापणी प्रयोग

342 गावांत होणार कापणी प्रयोग

sakal_logo
By

३४२ गावांत होणार कापणी प्रयोग
भातशेती प्रशिक्षणः नागलीसाठी ६३ गावांची निवड
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ः जिल्ह्यातील भात पीक कापणी प्रयोगासाठी ३४२ गावे व नागली पीक कापणी प्रयोगासाठी ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व विभागनिहाय नियोजन केले आहे. नियोजनानुसार पीक कापणी प्रयोगाची कार्यवाही निर्धारित वेळेत करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना केल्या असल्याची माहिती कृषी जिल्हा सल्लागार अरुण नातू यांनी दिली.
जिल्ह्यातील भात व नागली पीक कापणी प्रयोग जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग १९ व २० जुलैला झाला. या प्रशिक्षण वर्गास निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर उपस्थित होते. त्यांनी नियोजनानुसार पीक कापणी प्रयोगाची कार्यवाही सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्तालयाच्या नियोजनानुसार भात पीक कापणी प्रयोगासाठी जिल्ह्यातील ३४२ गावे व नागली पीक कापणी प्रयोगासाठी ६३ गावांचे नियोजन महसूल, जिल्हा परिषद कृषी व अधीक्षक कृषी या विभागांकडे करण्यात आले. त्यामध्ये महसूल विभागाकडे ७६ गावे, जिल्हा परिषद कृषी विभागाकडे १६१, कृषी विभागाकडे १०५ आणि नागली पिकाच्या पीक कापणी प्रयोगासाठी ६३ अशी एकूण ४०५ गावे अंतिम केली आहेत.
पिकाच्या उत्पन्नाची आकडेवारी राज्य तसेच केंद्र शासनास मूलभूत आणि धोरण विषयक बाबीसाठी आवश्यक असते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी उत्पन्नाचे आकडेवारी आधारभूत मानली जाते. पीक कापणी प्रयोगाचे आकडेवारी विश्वासार्ह व अचूक येण्यासाठी प्रयोगाचे काटेकोर पर्यवेक्षण होणे अत्यावश्यक आहे, असे कृषी जिल्हा सल्लागार नातू यांनी प्रशिक्षण वर्गात स्पष्ट केले.

चौकट
२६ पासून प्रशिक्षण वर्ग
तालुकास्तरावर २६ ते २९ जुलै या कालावधीत संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जाणार आहे. या ग्रामस्तरीय समितीमध्ये अंतिम निवड केलेल्या गावांचे सरपंच व पोलीस पाटील या अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे. असे श्री. नातू यांनी सांगितले.

कोट
पीक कापणी प्रयोगाच्या तक्त्यांच्या आवक स्थितीबाबतची पूर्णता जबाबदारी उपविभागीय स्तरावरील सांख्यिकी योजनांचे काम पाहणारे कृषी पर्यवेक्षक यांच्यावर निश्चित केली आहे.
- अरुण नातू, कृषी सल्लागार, सिंधुदुर्ग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79517 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top