
काँग्रेस जिल्हाध्यक्ष गावडेंचा तडकाफडकी राजीनामा
swt2115.jpg
बाळा गावडे
काँग्रेस जिल्हाध्यक्ष गावडेंचा
तडकाफडकी राजीनामा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा सुद्धा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामागे नेमके कारण समजू शकले नाही. काही वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
श्री. गावडे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर काँग्रेसची संघटना वाढीसाठी प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एकत्र करत त्यांनी पक्षाचे कार्य गेली काही वर्ष सुरु ठेवले होते. माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुरवातीला काही अडचणींवर मात करत पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पुर्ण केल्या होता. भाजप विरोधातील अनेक आंदोलने त्यांनी केली. त्यांनी अचानक राजीनाम्या देण्यामागील कारण समजू शकले नाही. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79520 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..