विजेचा धक्का लागून मृत कुटुंबियांना आर्थिक मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेचा धक्का लागून मृत कुटुंबियांना आर्थिक मदत
विजेचा धक्का लागून मृत कुटुंबियांना आर्थिक मदत

विजेचा धक्का लागून मृत कुटुंबियांना आर्थिक मदत

sakal_logo
By

swt2119.jpg
37644
कणकवलीः महावितरण ठेकेदार एजन्सी मार्फत प्राप्त धनादेश भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मिराशी, मोंडकर कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

‘त्या’ कंत्राटी कामगाराच्या
कुटुंबियांना आर्थिक मदत
ठेकेदार एजन्सीकडून दखलः निलेश राणे, अशोक सावंत यांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ः विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी (आचरा) आणि राकेश मोंडकर (तांबळडेग) यांच्या कुटुंबियांना भाजप नेते निलेश राणे व कंत्राटी विज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या पाठपुराव्यातून महावितरण कंपनीच्या ठेकेदार एजन्सीमार्फत प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत मिळवून दिली आहे. याबाबत प्राप्त झालेले धनादेश भाजप नेते राणे यांच्या हस्ते मिराशी, मोंडकर कुटुंबियांना आज देण्यात आले. या संपूर्ण प्रसंगात आम्हाला न्याय मिळवून देणाऱ्या निलेश राणे, अशोक सावंत व भाजपा पदाधिकाऱ्यांचे मिराशी कुटुंबियांनी आभार मानले आहेत.
आचरा येथे विज दुरुस्तीचे काम करत असताना मिराशी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. राकेश मोंडकर हे इळये येथे विज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यासह अन्य संघटना पदाधिकारी, भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. श्री. राणे यांच्या माध्यमातून महावितरण व ठेकेदार एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. पहिल्या टप्प्यात मिराशी कुटुंबियांना दोन लाख रोख स्वरुपात, अडीच लाख बँक खात्यात जमा झाले होते. तर राकेश मोंडकर यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात अडीच लाख जमा करण्यात आले होते. प्रत्येकी दहा लाख रुपये मदती पैकी जमा रक्कम व्यतिरिक्त उर्वरित रकमेचे धनादेश मिराशी, मोंडकर कुटुंबियांना राणे यांच्या हस्ते येथे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, रवी मालवणकर, मोहन कुबल, विजय निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79531 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..