नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग
नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग

sakal_logo
By

rat२१p१३.jpg-
३७५८४
रत्नागिरी ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे नूतन अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर, किशोर लुल्ला यांच्यासमवेत नूतन कार्यकारिणी सदस्य.
----------
नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग
राजेंद्र घाग; रोटरी क्लबचा महत्त्वाकाक्षी प्रकल्प
रत्नागिरी, ता. २१ ः रोटरी क्लब रत्नागिरीकडून जास्तीत जास्त समाजोपयोगी काम करू. महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच नवजात बालकांसाठी आवश्यक असा अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रुग्णालयात रोटरी क्लब रत्नागिरीमार्फत चालू करण्याचा मानस रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी व्यक्त केला. ३० लाख रुपयांचा हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये सुरू करण्यासाठी रोटरी क्लबला सढळ हस्ते सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रोटरी क्लबचा ६५वा पदग्रहण सोहळा अंबर हॉल येथे झाला. या वेळी घाग यांनी २०२२-२३ या वर्षासाठी अध्यक्षपदाची शपथ घेतली. रूपेश पेडणेकर यांनी सचिवपद स्वीकारले. कार्यक्रमासाठी पदग्रहण अधिकारी रोटरी क्लब ऑफ सांगलीचे किशोर लुल्ला प्रमुख उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष विजय पवार, सचिव जयेश काळोखे यांनी गतवर्षीच्या कार्यक्रमांचा अहवाल सादर केला. त्यानंतर रोटरी परिवारातील सदस्यांच्या मुलांचा गुणगौरव केला. तसेच चेतन पंदेरे, शशिकांत नाचणकर, लक्ष्मी ढेकणे, सुधीर रिसबुड, प्रणाली तोडणकर, हर्षद तुळपुळे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब रत्नागिरी सन २०२१-२२ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सदस्य राजेंद्र काळे, सचिन सारोळकर, दिलीप रेडकर, धरमसिभाई चौहान यांचा विशेष सत्कार केला.
या कार्यक्रमात रोटरी क्लबमार्फत दिव्यांग व्यक्तीला व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. असिंस्टट गर्व्हनर नीलेश मुळये यांनी मार्गदर्शन केले. किशोर लुल्ला यांनी रोटरीचे जगातील कार्य, महत्व, सदस्यांची जबाबदारी, ग्लोबल ग्रॅन्डबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन सदस्या वेदा मुकादम, नीता शिंदे, ऋता पंडित, माधुरी साळवी, मीरा सावंतदेसाई यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79536 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..