रत्नागिरी ः उदय बनेंचा 23 जुलैला कृतज्ञता सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः उदय बनेंचा 23 जुलैला कृतज्ञता सोहळा
रत्नागिरी ः उदय बनेंचा 23 जुलैला कृतज्ञता सोहळा

रत्नागिरी ः उदय बनेंचा 23 जुलैला कृतज्ञता सोहळा

sakal_logo
By

- rat२१p१८.jpg
L37594
- उदय बने
---------------
उदय बनेंचा २३ जुलैला कृतज्ञता सोहळा

अनंत गितेंची उपस्थिती; राजकीय कार्यक्रम नव्हे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः समाजकारणासह राजकारणात काम करत असताना अनेकांनी पाठबळ आणि आशीर्वाद दिले. त्यामुळेच दोन मोठ्या अपघातांसह ब्रेन हॅमरेजसारख्या आजारपणातून लिलया बाहेर पडलो आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने २३ जुलैला स्वा. सावरकर नाट्यगृहात सकाळी ११ वा. कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले आहे. या वेळी मार्गदर्शक माजी खासदार अनंत गिते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ शिवसैनिक उदय बने यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद त्यांनी साधला. बने यांनी मागील ६० वर्षातील जीवनात घडलेल्या घडामोडींची माहिती दिली; मात्र त्यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले नाही. ते म्हणाले, २३ जुलै १९६२ ला दापोलीत जन्म झाला. वडील पोलिसखात्यात असल्यामुळे नोकरीनिमित्त विविध ठिकाणी जावे लागत होते. प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर वेळप्रसंगी गॅरेजमध्येही काम केले. एका खासगी कंपनीत नोकरी केली. ती करत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आवडल्यामुळे शिवसेनेचे काम करण्यास आरंभ केला. शिवसेनेची पहिली शाखा सुरू करण्यावेळी माझी मुख्य भूमिका होती. माजी खासदार अनंत गितेंचे मार्गदर्शन जीवनात उपयुक्त ठरले. १९९५ आणि २००१ ला दोन मोठे अपघात झाले. त्यानंतर २०१८ ला ब्रेनहॅमरेज झाला. यामधून सहीसलामत बाहेर पडलो. जीवनाच्या या प्रवासामध्ये ज्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले त्यांची कृतज्ञता मानण्यासाठी सोहळ्याचे आयोजन केले आहे.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79544 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..