आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी स्पर्धेत संगमेश्वरची सुकन्या रुई विचारेची चमकदार कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी स्पर्धेत संगमेश्वरची सुकन्या रुई विचारेची चमकदार कामगिरी
आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी स्पर्धेत संगमेश्वरची सुकन्या रुई विचारेची चमकदार कामगिरी

आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी स्पर्धेत संगमेश्वरची सुकन्या रुई विचारेची चमकदार कामगिरी

sakal_logo
By

आंतरराज्यस्तरीय एनसीसी नेमबाजी स्पर्धेत
संगमेश्वर सुकन्या रुईची चमकदार कामगिरी
संगमेश्वर, ता. २१ ः चंदीगड येथे ६ जुलैला पार पडलेल्या एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडास्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेल्या रुई विनायक विचारे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राला एनसीसी कॅडेट्सनी सलग दुसऱ्या वर्षी प्रथम विजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (१९ जुलै ) रुईसह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केला.या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध गटांमधून १७ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यात सध्या शिक्षणानिमित्त पुणे येथे असलेल्या रुई हिचाही समावेश होता. मूळची संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेली रुई ही सध्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रामधून चंदीगडमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या रुई हिने ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिने तिच्या गटातून खेळताना संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ५० मीटर रायफल शूटिंगमध्ये तामिळनाडूतील मुलीने प्रथम तर रुईने दुसरे स्थान पटकावले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सनी महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून दिले. याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कॅडेट्सना १९ जुलैला राजभवनात बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
या वेळी एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कमांडर सतपाल सिंह, ब्रिगेडियर सी. मधुवाल, नेमबाजी चमूचे प्रभारी अधिकारी कर्नल सतीश शिंदे तसेच नेमबाजी स्पर्धेतील स्पर्धक उपस्थित होते.
..........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79569 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..