चिपळूण ः महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण ः शेखर निकम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण ः शेखर निकम
चिपळूण ः महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण ः शेखर निकम

चिपळूण ः महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण ः शेखर निकम

sakal_logo
By

महाआघाडीमुळे ओबीसींना न्याय

आमदार निकम; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
चिपळूण, ता. २१ ः महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी पायाभरणी केली होती, त्याला यश आले आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इंम्पेरिकल डाटा व ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याने ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेले आहे. ओबीसी आरक्षणावर राजकारण करत त्याचे खापर मात्र महाविकास आघाडीवर फोडण्याचे काम झाले; पण सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारने गठित केलेल्या बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुकीस परवानगी देऊन न्याय दिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ ला ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षण स्थगित केले होते व ते पुन्हा मिळवण्यासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. १० मार्च २०२२ला बांठिया आयोगाची स्थापना करण्यात आली. २६ मे २०२२ ला ९९ टक्के डाटा जमा करण्यात आला. १० जुलैला डाटाचे विश्लेषण आणि रिपोर्ट सादर करण्यात आले. त्यामुळे बांठिया आयोगाची स्थापना करून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यात महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना त्याचे श्रेय जाते.
...
चौकट
विधिमंडळातही आवाज उठवला
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यापासून लावून धरली होती. ओबीसी समाजावर अन्याय झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठामपणे मांडली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलने केली व विधिमंडळातही आवाज उठवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठपुराव्याला व महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे, असे आमदार निकम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79577 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top