
दहशतवादी हल्ला प्रतिकाराची रंगीत तालीम
rat२१p३३.jpg
३७६५५
रत्नागिरीः ऑपरेशन रत्नदुर्गअंतर्गत राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये पकडण्यात आलेले दहशतवादी आणि टीम.
rat२१p३४.jpg-
३७६५६
आकाशवाणी केंद्रामध्ये ओलिस ठेवलेल्या कर्मचाऱ्याला सोडवण्यासाठी अॅक्शन मोडवर असलेला ब्ल्यू फोर्स.
--------------
दहशतवादी हल्ला प्रतिकाराची रंगीत तालीम
रत्नागिरी पोलीस; २ वाहने, ८ बोगस दहशतवादी
रत्नागिरी, ता. २१ः येत्या १५ ऑगस्टला दहशतवादी हल्ला होण्याच्या शक्यतेने जिल्हा पोलिस दलाने सुरक्षिततेची जोरदार तयारी केली आहे. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवली. जिल्ह्यात ‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ (डमी डीकॉय) ही मोहीम राबवून बनावट दहशतवादी रेड फोर्स विरुद्ध ब्ल्यू फोर्स रंगीत तालिम घेण्यात आली. यामध्ये २ वाहने, ८ दहशतवादी यांचा वापर करण्यात आला. त्यांना जयगड आणि रत्नागिरी येथे जेरबंद करण्यात यश आले.
मुंबई येथे सन १९९३ मध्ये झालेला बॉम्बस्फोट व २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सागरी सुरक्षेला महत्व आलेले आहे. यातून सागरी सुरक्षेसाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या. यापैकी समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये विशेष सागरी पोलिस ठाणे आणि किनारपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस चेकपोस्ट उभारण्यात आले. मुंबईला लागूनच कोकण किनारपट्टी असल्याने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी/अतिरेकी घुसखोरी करून हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्याच्या अनुषंगाने काल जिल्ह्यात ''ऑपरेशन रत्नदुर्ग'' (डमी डीकॉय) ही मोहीम राबवण्यात आली.
रेड फोर्सकडून जिल्ह्यातील मर्मस्थळे, गर्दीचे ठिकाणे, चेकपोस्ट इत्यादी ठिकाणे लक्ष्य करण्यात आली. रेड फोर्स म्हणून २ वाहने, ८ बोगस दहशतवादी यांचा वापर करण्यात आला. या दहशतवाद्यांकडून बनावट स्फोटक पदार्थांची वाहतूक करून सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ''ब्ल्यू फोर्स'' म्हणून जिल्ह्यात ठिकाणी ३३ पोलिस अधिकारी व १५९ पोलिस अंमलदार, ३८ होमगार्ड, ५१ सुरक्षावॉर्डन, १५५ सागररक्षक दल सदस्य, ५ नौका पोलिस अधिकारी, ६ नौका पोलिस अंमलदार असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेकपोस्ट येथे रेड फोर्समधील २ बनावट दहशतवाद्यांना पावणेबारा वाजता बनावट स्फोटक पदार्थ वाहतूक करत वाहनासह पकडण्यात आले तसेच रत्नागिरी शहर पोलिसांच्या हद्दीतील एसबीआय मुख्य शाखा जयस्तंभ येथेही १२.४५ वाजता २ बोगस दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यानंतर थिबापॅलेस येथे दोन संशयितांना पकडण्यात आले.
आकाशवाणी केंद्रात शीघ्र कृतिदलाने (QRT)शिताफीने आकाशवाणी प्रसार भारतीच्या इमारतीमध्ये ऑपरेशन राबवले. तेथे २ बोगस दहशतवाद्यांना पकडून व त्यांनी ओलिस ठेवलेल्या प्रसारभारतीच्या एका कर्मचाऱ्यास सुखरूप बाहेर आणले. त्यानंतर दहशतवाद्यांकडे आढळून आलेल्या बॅगांमध्ये संशयास्पद वस्तू असल्याने बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून संशयित वस्तूंची तपासणी करण्यात आली. त्यात आक्षेपार्ह/संशयित काही आढळून आलेले नाही. अशा प्रकारे आठ दहशतवाद्यांना पकडण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79599 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..