
दाभोळ-पाईपलाईनच्या खड्ड्यात रुतली मोटार
-rat२१p३६.jpg
३७६६६
ः दापोली ः चिखलात रुतून बसलेले वाहन.
------------
पाईपलाईनच्या खड्ड्यात रुतली मोटार
दापोली नगरपंचायतीचा कारभार; नागरिकांत नाराजी
दाभोळ, ता. २१ ः दापोली शहरातील झरीआळी येथे भररस्त्यात पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खणलेल्या खड्ड्यात मोटार चिखलात रुतून बसले. ते काढण्यासाठी टोईंग व्हॅन आणावी लागल्याने दापोली नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.
दापोली शहरातील सारंग मार्गावर प्रभूआळीत जलवाहिनी टाकण्यासाठी एक मोठा चर खोदण्यात आला होता व हा चर केवळ माती टाकून बुजवण्यात आला होता. दापोलीत पडलेल्या मोठ्या पावसाने चरातील माती रस्त्यावर येऊन चिखल झाला होता. त्यामुळे नागरिकांना तेथून चालणेही कठीण झाले होते. बुधवारी (ता. २०) याच बुजवलेल्या चरावरून जात असलेले एक पिकअप् वाहन या चरातील चिखलात रुतून बसले. ते वाहन बाहेरही निघत नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या इतर वाहनांचा खोळंबा झाला. अखेर तेथील नागरिकांनी टोईंग व्हॅन आणून हे वाहन बाहेर काढले. यामुळे दापोली नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
--------------
चौकट
दापोली नगरपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीवरून प्रभूआळी येथे पाइपलाइन टाकण्याचे काम झरीआळी येथे सुरू आहे; मात्र तेथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या विरोधामुळे या कामाला विलंब झाला. पावसामुळे माती सैल होऊन गाडी रुतली; मात्र आता तेथे डबर टाकून चर बुजवण्यात येत आहे व लवकरच तेथे सिमेंट काँक्रिट भरून हा चर भरण्यात येईल.
- देवानंद ढेकळे, मुख्याधिकारी, दापोली नगरपंचायत
------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79605 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..