
दाभोळ-कोंढेतील गोठ्यात बिबट्या मृतावस्थेत
-rat२१p३९.jpg
३७६९०
ः दाभोळः मृतावस्थेत सापडलेला बिबट्या.
--------------
कोंढेतील गोठ्यात बिबट्या मृतावस्थेत!
अडीच वर्षाची मादी; मृत्यूचे कारण अस्पष्ट
दाभोळ, ता. २१ ः दापोली तालुक्यातील साखळोली गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. अनेकांवर बिबट्याने हल्ले केल्याची घटना नुकतीच घडली असतानाच कोंढे तेलीवाडी येथे गुरुवारी (ता. २१) दुपारी बाराच्या सुमारास गोठ्यामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला.
नेहमीप्रमाणे गावातील शेतकरी राजू कदम आपल्या बकऱ्या घरी नेत असताना वाटेवर असणाऱ्या शरद रहाटे यांच्या गोठ्यातून घाण वास येऊ लागला व माशा घोंगावण्याचा आवाज आला. म्हणून त्यांनी गोठ्याचे दार उघडून आत पाहिले असता बिबट्या आत असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच गावकऱ्यांना बोलावले व घटना सांगितली. गावकऱ्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता बिबट्या मृतावस्थेत आढळून आला, याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यावर परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, वनपाल सावंत, वनरक्षक (ताडील) शुभांगी भिलारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील सोपस्कार केले. हा मृत बिबट्या अडीच वर्षाचा असून मादी जातीचा आहे.
कोंढे गावामध्ये बिबट्याचा वावर हा वाढला होता. अनेक पाळीव जनावरे त्यांनी मारली आहेत. दिवसाढवळ्या या बिबट्यांचे लोकांना दर्शन होत होते. जंगलामध्ये शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मृतावस्थेत बिबट्या सापडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बिबट्याच्या मृत्यचे कारण अद्याप समजलेले नाही.
------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79608 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..