पान तीन मेन-कोलगाव गोडाऊन समस्येंच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान तीन मेन-कोलगाव गोडाऊन समस्येंच्या विळख्यात
पान तीन मेन-कोलगाव गोडाऊन समस्येंच्या विळख्यात

पान तीन मेन-कोलगाव गोडाऊन समस्येंच्या विळख्यात

sakal_logo
By

swt2113.jpg
37638
कोलगावः येथील शासकीय गोदामाची पाहणी करताना पुंडलिक दळवी व अन्य. (छायाचित्रः रुपेश हिराप)

कोलगाव गोडाऊन समस्येंच्या विळख्यात
‘राष्ट्रवादी’चा आरोपः जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः कोलगाव येथे उभारलेल्या शासकीय गोडाऊनच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. तेथे असलेल्या विविध समस्या पाहता ही इमारत वापरास येणे शक्य नाही, त्यामुळे या जागेची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला.
श्री. दळवी यांनी आज सहकारी पदाधिकाऱ्यांसह कोलगाव येथील शासकीय गोदामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी येथील विविध प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असताना ही इमारत कशी काय बांधण्यात आली? या जागेच्या प्रस्तावाला मंजुरी कशी काय देण्यात आली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. प्रशासनाच्या माध्यमातून या कामात भ्रष्टाचार झाला असून, या गोडाऊनकडे जाणारा मुख्य रस्ता ते गोदाम हा मार्ग अरुंद आहे. यामध्ये असणारा पूल नाजूक अवस्थेत आहे. त्यामुळे अवजड वाहतूक झाल्यास तो कोसळण्याची शक्यता आहे. या पुलावरून मालवाहू गाडी देखील जाणे शक्य नाही. शिवाय ज्या ठिकाणी माल उतरवला जाणार आहे, त्या ठिकाणी घळण आहे. गाडी पार्क करण्यासाठी ६ फुटांचे अंतर सुद्धा नाही. त्यामुळे मालवाहू ट्रक येथे उभे राहू शकत नाहीत. याबाबत विचारणा केली असता बांधकाम विभाग पुरवठा विभागावर ढकलत आहेत. ही जागा पुरवठा विभाग ताब्यात घेऊ शकत नाही‌. घेतल्यास तिचा उपयोग देखील होणार नाही. त्यामुळे ही जागा निवडणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधितांवर कारवाई कारवाई व्हावी, यासाठी श्री. दळवी यांनी उपोषणाचा मार्ग हाती घेतला आहे.
शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, मोटार संघटना अध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका कार्यकारिणी सदस्य राकेश नेवगी, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79637 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..