पटवर्धन विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पटवर्धन विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप
पटवर्धन विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप

पटवर्धन विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

37789
कारिवडे ः येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप करताना सुहासिनी येडवे. शेजारी अॅड. संतोष सावंत आदी.

पटवर्धन विद्यालयात
शैक्षणिक साहित्य वाटप

सावंतवाडी ः कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या मुलांना वह्या, गणवेश व क्रीडा साहित्य बांदा येथील सौ. वैशाली येडवे यांनी दिले व त्याचे वाटप केले. सौ. येडवे यांच्या आई तथा निवृत्त अंगणवाडी शिक्षिका सौ. सुहासिनी येडवे व पत्रकार संतोष सावंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्‍घाटन सौ. येडवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शाळेतील आठवीच्या मुलांना गणवेश व नववी व दहावीच्या मुलांना वह्या तसेच या शाळेला क्रीडाविषयक व्हॉलीबॉलचे साहित्य भेट म्हणून दिले. यावेळी सौ. येडवे यांचा शाळेच्यावतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन अॅड. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विद्यार्थिनी अंकिता परब हिने मानले. यावेळी कर्मचारी विष्णू परब, श्रीमती पी. व्ही. जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.
-------------
37790
सावंतवाडी ः प्रांजल लिंगवतचा सत्कार करताना चंद्रकांत कासार. शेजारी अपर्णा कोठावळे, श्रुतिका दळवी आदी.

प्रांजलला शिवसेनेतर्फे मदत
सावंतवाडी ः वेर्ले येथील होतकरू विद्यार्थिनी प्रांजल लिंगवत ही दहावीत ९१ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत व महिला शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी सहकार्याचा हात पुढे केला. शिवसेना सावंतवाडी शाखेत प्रांजली हिला हे सहकार्य करण्यात आले. प्रांजलच्या आई सौ. शितल लिंगवत या आशा स्वयंसेविका आहेत. कोरोना काळात त्यांनी जीवावर उदार होऊन उत्कृष्ट कार्य केले आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, महिला तालुका प्रमुख कोठावळे, उपतालुका प्रमुख राजू शेटकर, महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी, सुनिता राऊळ उपस्थित होते. यावेळी कोठावळे यांनी शिवसेना नेहमीच होतकरू मुलांच्या पाठीशी उभी राहील, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79798 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..