ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित दावे प्राधान्याने सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित दावे प्राधान्याने सोडवा
ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित दावे प्राधान्याने सोडवा

ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित दावे प्राधान्याने सोडवा

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित
दावे प्राधान्याने सोडवा

संघाची मागणी; ताराखांमुळे शारिरीक त्रास

कुडाळ, ता. २२ ः जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचे दावे कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. दर दोन ते तीन महिन्यांनी त्यांना सुनावणीसाठी ५० ते ६० किलोमीटर अंतरावरुन यावे लागत असल्याने त्यांना शारीरिक व आर्थिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणातील तरतुदीनुसार हे दावे प्राधान्याने निकामी काढून त्यांना सहानुभूती दाखवावी, असा ठराव येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभेत घेण्यात आला.
येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यकारीणीची सभा अध्यक्ष दत्तात्रेय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या कार्यालयात झाली. यावेळी उपाध्यक्षा मिनाक्षी नार्वेकर, सचिव चंद्रकांत पाटकर, कार्याध्यक्ष शरद कांबळी, कोषाध्यक्ष आर. आर. दळवी, सल्लागार चंद्रकांत अणावकर, ज्येष्ठ सदस्य मनोहर आंबेकर, सी. टी. कोचरेकर, उदय कुडाळकर, सौ. उषा आठले व कार्यकारीणीचे सदस्य उपस्थित होते. १ ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रथम सत्रात संघाची वार्षिक सभा व द्वितीय सत्रात ज्येष्ठ नागरिक मेळावा घेऊन ज्येष्ठांना प्राणायाम व योगासनाचे प्रशिक्षण देणे आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठाचा सत्कार करुन सन्मान करण्याचे ठरविण्यात आले. येथील नवीन बस स्थानकात प्रवाशांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही, वेळापत्रक व पिण्याच्या पाण्याची व इतर आवश्यक सुविधा नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावे लागतात. यासंदर्भात विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे रितसर लेखी तक्रार देण्याचे ठरविण्यात आले. सचिव पाटकर यांनी मागील सभा इतिवृत्त व केलेली कार्यवाही अहवाल वाचन केले. चर्चेअंती त्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79813 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..