''सिंधुदुर्ग रोटरी''चा उद्या पदग्रहण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सिंधुदुर्ग रोटरी''चा उद्या पदग्रहण सोहळा
''सिंधुदुर्ग रोटरी''चा उद्या पदग्रहण सोहळा

''सिंधुदुर्ग रोटरी''चा उद्या पदग्रहण सोहळा

sakal_logo
By

37797
सिंधुदुर्गनगरी ः रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या पत्रकार परिषदेत बोलताना मध्यभागी नवीन अध्यक्ष उदयकुमार जांभवडेकर. डाव्या बाजूला मावळते अध्यक्ष डॉ. प्रशांत कोलते, उजव्या बाजूला प्रभाकर सावंत.

‘सिंधुदुर्ग रोटरी’चे कार्य कौतुकास्पद

पदाधिकाऱ्यांची माहिती; उद्या पदग्रहण, विविध उपक्रम राबविण्याचा मानस

ओरोस, ता. २२ ः रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या अध्यक्षपदी उदयकुमार जांभवडेकर, सचिवपदी नवीन बांदिवडेकर, खजिनदारपदी व्हिक्टर फर्नांडिस यांची निवड केली जाणार आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी (ता.२४) सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील इच्छापूर्ती हॉलमध्ये सायंकाळी सहाला होणार आहे. क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ. प्रशांत कोलते व नवीन अध्यक्ष उदयकुमार जांभवडेकर, पदाधिकारी प्रभाकर सावंत यांनी ही माहिती दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या पदाधिकारी यांनी ही माहिती दिली. पदग्रहण सोहळ्याला प्रशांत मेहता पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रणय तेली, गजानन कांदळगावकर, दीपक बेलवलकर, निता गोवेकर आदी रोटरीयन तसेच रानबांबुळी सरपंच वसंत बांबुळकर, माजी अध्यक्ष डॉ. कोलते, पदग्रहण कार्यक्रम अध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. ते म्हणाले, ‘‘रोटरी पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्यकारिणी २८ जणांची आहे. यात डॉ. कोलते, हेमंत बागवे, सत्यवान चव्हाण, अरुण मालणकर, दीपक आळवे, उल्हास पालव, प्रवीण मोरजकर, प्रभाकर सावंत, डॉ. वैभव आईर, शंकरराव कोकितकर, डॉ. दर्शना कोलते, डॉ. सिद्धार्थ परब, समीर परब, अभिजित जैतापकर, अतुल बागवे, मयुरी जैतापकर, सिद्धांत सावंत, भालचंद्र सावंत, रविकमल डांगी, डॉ. वैद्यही आईर, आनंद मसुरकर, व्यंकट मनस्पुरे, गौरव चौगुले, मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे. पदग्रहण सोहळ्यावेळी जलतरणपटू पूर्वा गावडे, श्रावणी पालव, प्रसाद परब व जिल्हा क्षय रोग विभाग यांना फेलोशिप पुरस्कार देण्यात येणार आहे. कल्पेश कदम यांना व्हेकेशन पुरस्कार देण्यात येणार आहे.
----------
चौकट
उपक्रमांची राष्ट्रीय दखल
मावळते अध्यक्ष डॉ. कोलते म्हणाले, ‘‘फेब्रुवारी २०२१ मध्ये रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलची स्थापना झाली. पहिले अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. ३० जूनला ही मुदत संपली आहे. वर्षभरात आम्ही एकूण १०० उपक्रम राबविले. यातील हॅप्पी स्कूल हा उपक्रम चांगला गाजला. रोटरीच्या राष्ट्रीय पुस्तिकेत याची माहिती प्रसिद्ध झाली होती. याच बरोबर मुलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण, मुलांना कुक्कुट पक्षी वितरण, ४२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, ३२ विद्यार्थ्यांना चष्मा वाटप, ८६ मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप, १८ मुलींना मोफत सायकल वाटप, १६० मुलांना आयडियल स्टडी अभ्यासक्रम, तीन बस थांब्यांचे नूतनीकरण हे उपक्रम लक्षवेधी ठरले.
-------------
चौकट
विविध उपक्रम राबवणार
नवीन अध्यक्ष जांभवडेकर यांनी, ‘‘आपण १ जुलैपासून पदभार स्वीकारला आहे. गतवर्षी आमच्या क्लबने सर्वाधिक उपक्रम राबविले. यावर्षीही तसेच काम करणार. कोरोनाने आई वडील गमावलेल्या चार मुलांना आमचे रोटरीयन दत्तक घेणार आहेत. एमपीएससीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79814 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top