चिपळूण-पेढे-कोष्टेवाडीत 15 लाखाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-पेढे-कोष्टेवाडीत 15 लाखाचे नुकसान
चिपळूण-पेढे-कोष्टेवाडीत 15 लाखाचे नुकसान

चिपळूण-पेढे-कोष्टेवाडीत 15 लाखाचे नुकसान

sakal_logo
By

rat२२p६.jpg-
३७७९९
चिपळूणः पेढे कोष्टीवाडी येथे फुटलेली जलवाहिनी रात्री दुरुस्त करताना कर्मचारी.
---------
पेढे-कोष्टेवाडीत १५ लाखाचे नुकसान
पाईपलाईन फुटली ; नुकसानभरपाईची मागणी
चिपळूण, ता. २२ : तालुक्यातील पेढे कोष्टेवाडी येथे लोटे एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यामुळे सहा घरातील विविध उपकरणांचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने याचा पंचनामा केला आहे.
मंगळवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली होती. ढगफुटी पेक्षाही भयानक अनुभव येथील ग्रामस्थांना आला. या घटनेत पाण्याच्या प्रचंड वेगाने परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले. पेढे येथून लोटे येथील एमआयडीसीला जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास पेढे-कोष्टेवाडी येथे ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे जलवाहिनीतील पाण्याच्या दाबामुळे परिसरातील सहा घरांत पाणी शिरले. काही घरांची कौले फुटून घरात पाणी शिरले. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने ग्रामस्थांना तत्काळ काहीच उपाययोजना करता येत नव्हत्या. हे पाणी घरात शिरल्याने उपकरणांसह विविध साहित्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रवीण पाकळे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला माहिती दिली. तलाठी भारत जाधव यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. त्यानुसार स्वप्नील हळदे, प्रवीण हळदे, विष्णू देंडे, उषा कोळंबेकर यांच्यासह सहा जणांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पेढे येथे वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. अडीच महिन्यांपूर्वीही जलवाहिनी फुटली होती. या घटनेतील संबंधितांना १ लाख ३५ हजाराची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मात्र नुकसान भरपाई महिनोमहिने मिळत नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79821 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..