चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

sakal_logo
By

rat22p7.jpg-
37804
चिपळूणः चिपळूण-पोफळी मार्गावर पडलेले खड्डे.
-------------
पोफळी मार्गावरील
खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
वसंत ताम्हणकर; खड्डे न बुजवल्यास आंदोलन
चिपळूण, ता. २२ : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पावसाने पडल्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी दिला आहे.
चिपळूण-कराड मार्गावरील पोफळी ते पिंपळीपर्यंतच्या रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. पोफळी नाका, सरफरेवाडी, सय्यदवाडी, शिरगाव बौद्धवाडी, बाजारपेठ, ब्राह्मणवाडी, मुंडे, पिंपळी खुर्द या ठिकाणी दोन ते तीन फूट खोल व चार ते पाच फूट लांबीचे खड्डे या रस्त्यावर आहेत.
खड्ड्यांमुळे दुचाकींना अपघात होत आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चाके पंक्चर होत आहेत, तर चारचाकी वाहने अनेकवेळा खालून खड्ड्यातून वर येताना रस्त्याचा कोपरा, दगड लागल्याने ऑईल टाकी फुटल्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावर चिखल असल्याने प्रवास करताना वाहनचालक जीव मुठीत धरून वाहन चालवित आहेत. रोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मोठे ट्रक व या रस्त्याने ये-जा करत असतात, त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात येऊन खड्ड्यात मुरुम व खडी टाकावी, अशी मागणी वसंत ताम्हणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
----------
कोट
जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पावसापासून रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरू झाले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही खड्डे भरलेले नाहीत. पोफळी मार्गावरील खड्डे भरण्यासाठी शासनाकडून निधी येतो का? येत असेल तर तो खर्च होतो का? होत असेल तर खड्डे का बुजवले जात नाही याची चौकशी व्हावी अशी मागणी मी करणार आहे.
- वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष, भाजप

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79822 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top