कणकवलीतील सरपंचांचे स्नेहसंमेलन अनुकरणीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीतील सरपंचांचे
स्नेहसंमेलन अनुकरणीय
कणकवलीतील सरपंचांचे स्नेहसंमेलन अनुकरणीय

कणकवलीतील सरपंचांचे स्नेहसंमेलन अनुकरणीय

sakal_logo
By

L37829

कणकवली ः तालुक्यातील सरपंच व अधिकारी.

कणकवलीतील सरपंचांचे
स्नेहसंमेलन अनुकरणीय
विनायक ठाकूर ः बेळणेत उत्साहात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २२ ः कणकवली तालुक्यातील सर्व पक्षीय सरपंचांचे हे एकत्रित स्नेहसंमेलन पाहून मनाला समाधान वाटले. पदे ही काही कालावधीसाठी असतात. मात्र, माणूस आणि माणूसकी शेवटपर्यंत राहते. सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जे स्नेहसंमेलनाचे आयोजन केलात हे जिल्ह्यासह राज्यासाठी अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) विनायक ठाकूर यांनी बेळणे येथे केले. ते आशिष मंगल कार्यालयात सर्वपक्षीय कणकवली तालुका सरंपच परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपूरे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद विस्तार अधिकारी महादेव शिंगाडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे यांच्यासह कणकवली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व कुटंबिय उपस्थित होते.
श्री. ठाकूर म्हणाले, "आज तुम्ही पाच वर्षे संरपंच राहिलात. या पाच वर्षातील पुढील चार महिने शिल्लक आहेत. यामध्ये तुम्ही कोणते काम केले? लोकांची काय गरज होती? यासाठी समाधानी आहात का? याचे सिंहावलोकन करुन याचा विचार करणे गरजेचे आहे." श्री. तनपूरे म्हणाले, "तुम्ही लोकनियुक्त सरंपच आहात. तुम्ही तुमची जबाबदारी समर्थपणे पार पाडलात. कोरोना काळात तुम्ही जनतेची जी सेवा केलात ते तुमचे भाग्य आहे." गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाले, "जिल्ह्यातील सरंपच संघटनांपैकी कणकवली तालुका सरपंच संघटनेने सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जो स्नेहसंमेलन आयोजित केला हा नविन पायंडा पडला आहे. हा पायंडा यापुढे असाच सुरु ठेवा" यावेळी ओटव सरपंच हेमंत परुळेकर, शेर्पे सरंपच निशा गुरव यांनी सरपंचाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत महिला सरपंचमधून नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर तर पुरुष सरपंचमधून बिडवाडी सरपंच सुदाम तेली यानी क्रमांक पटकाविला. प्रास्ताविक वाघेरी सरंपच संतोष राणे व आभार करुळ संरपच कर्णिक यांनी केले.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79856 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top