बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर
बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर
रत्नागिरीतील तीन, सिंधुदुर्गातील दोन ; सत्कार पोस्टाद्वारे पाठविणार
रत्नागिरी, ता. २२ : बोडस चॅरिटेबल ट्रस्टने दहाव्या वर्षानिमित्ताने पाच विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. वैयक्तिक सन्मानपत्रे आणि चार हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन दांपत्याचा समावेश आहे. एक दांपत्य दिव्यांग म्हणजे उभयता मुकबधिर आहे.
हर्चे (ता. लांजा) येथे गेली ५० वर्षे दुर्गम आणि ग्रामीण भागात अपुऱ्या सुविधा असतानाही हजारो रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणारे डॉ. शंकर कलवारी आणि डॉ. सौ. सद्बुद्धी कलवारी हे सन्मानित असे सर्वात वृद्ध दांपत्य आहे. रीळ- केसपुरी येथे गेली १८ वर्षे भात पिकावर संशोधन, बीजोत्पादन, देशी गाई संवर्धक मिलिंद वैद्य आणि सौ. सुवर्णा वैद्य हे सन्मानित असे सर्वात तरुण दांपत्य आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवा ट्रस्टचे तिसऱ्या क्रमांकाचे खोत म्हणून गेली २८ वर्षे आषाढ दशमी उत्सव, श्रावण संततधार, शिमगोत्सव आदी विविध धार्मिक कर्तव्ये पार पडणारे बोधामृत फाटक आणि सौ. शुभदा फाटक यांनाही सन्मानित केले जाणार आहे.
कुंभार्लीवाडी मळगाव (ता. सावंतवाडी) येथील गोसावी घराण्यात श्रावणात दीड दिवसांचा नागपंचमी उत्सव साजरा करण्याची २०० वर्षापेक्षा जुनी प्रथा आहे. एकत्र कुटुंबात हा उत्सव सर्व गावकऱ्यांसोबत साजरा होतो. शेतकऱ्याचा मित्र सर्प याच्या बद्दलचे प्रेम, निसर्ग संगोपन आणि सामाजिक सलोखा या कार्याबद्दल गोसावी कुटुंबाचे प्रतिनिधी व गेली २२ वर्ष ही जबाबदारी सांभाळणारे धर्मनाथ गोसावी आणि सौ. रेश्मा गोसावी यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. फाटक दांपत्याचा गौरव देवी भैरी जुगाई ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे आणि उपाध्यक्ष राजन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उर्वरित सत्कार पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार असल्याचे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार सौ.आदिती पटवर्धन यांनी कळविले आहे.

चौकट
धुरी दांपत्याचा विशेष सत्कार
सिंधुदुर्गातील वेतोरे देऊळवाडी (ता. वेंगुर्ले) येथील दिव्यांग रुपाजी धुरी आणि रुपाली धुरी या दांपत्याने शेती करताना, खूप धडपड करुन आपल्या पूजा या (२३ वर्षीय) मुकबधीर कन्येला पदवीपर्यत शिक्षण दिले. जीय डी. आर्ट परीक्षेत पूजा राज्यात दिव्यांग गटात पहिली आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79881 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top