डंपर चालकांना न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपर चालकांना न्यायालयीन कोठडी
डंपर चालकांना न्यायालयीन कोठडी

डंपर चालकांना न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

डंपर चालकांना न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी ः विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करताना पळून गेलेल्या दोघा डंपर चालकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. भिन्नु पुन्नू पवार (४१ रा. कर्नाटक) व मनोज सुरेश शिंदे (३० रा. निवजे-देऊळवाडी, कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांनाही काल सावंतवाडी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्यांना न्यायालयात जर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. तर आज त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. १७ जुलैला मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे महसूल प्रशासनाकडून विनापरवाना वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू होती. यावेळी संबंधित दोन्ही डंपरचालकांना थांबण्याचा इशारा करूनही त्यांनी पालायन केले होते. दरम्यान, याप्रकरणी नेमळे तलाठी अरुण पाटोळे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. काल त्यांचा शोध घेऊन त्यांना डंपरसह अटक करण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79922 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..