दहावीतील गुणवतांचा ओझरमध्ये सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीतील गुणवतांचा ओझरमध्ये सत्कार
दहावीतील गुणवतांचा ओझरमध्ये सत्कार

दहावीतील गुणवतांचा ओझरमध्ये सत्कार

sakal_logo
By

टीपः swt२२१७.jpg मध्ये फोटो आहे.
ओझर ः विद्यामंदिर येथे दहावीतील गुणवंतांना गौरविल्यानंतर मान्यवर.

ओझरमध्ये गुणवंतांचा सत्कार
मालवण, ता. २२ ः ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमधून मार्च २०२२ च्या शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तथा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रशांत पारकर यांच्या उपस्थितीत नुकताच ओझर विद्यामंदिरच्या बहुउद्देशीय सभागृहात झाला.
प्रारंभी मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर शंभर टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी प्रशांत पारकर यांनी प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्याला रोख शंभर रुपयाचे पारितोषिक दिले. ‘‘बिकट परिस्थितीवर स्वकष्टाने मात करून यश संपादन करता येते,’’ असे प्रशांत पारकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वानुभवाचे दाखलेही दिले. दरम्यान, दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले पारकर यांनी यापूर्वीही शाळेसाठी अनेक स्वरुपात योगदान दिले आहे. प्रशालेमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आर्या पारकर हिने सत्कारमूर्तींच्यावतीने मनोगत व्यक्त करताना यापुढेही शाळेचा निकाल दर्जेदार राखण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावर्षी दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधून निष्ठा कांबळी आणि रितू पाल यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ‘‘आम्हीही शाळेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवू,’’ असे वचन दिले. शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनीही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य श्रीराम परब, राजेंद्र सुतार उपस्थित होते. शिक्षक पी. के. राणे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80002 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top