कळसुली मतदारसंघात विकासासाठी कटिबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसुली मतदारसंघात विकासासाठी कटिबद्ध
कळसुली मतदारसंघात विकासासाठी कटिबद्ध

कळसुली मतदारसंघात विकासासाठी कटिबद्ध

sakal_logo
By

38005
कळसुली ः कल्पवृक्ष वाटप करताना प्रफुल्ल सुद्रिक व शेतकरी.

कळसुली मतदारसंघात
विकासासाठी कटिबद्ध
सुद्रिक ः राष्ट्रवादीतर्फे कल्पवृक्ष वाटप

कुडाळ, ता. २३ ः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. यावेळी ग्रामस्थांना कल्पवृक्ष रोपांचे वाटप केले. भविष्यातही मतदारसंघात विकासगंगा आणण्यासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी यावेळी केले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात श्री. सुद्रिक यांच्या सौजन्याने शालेय, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी श्री. सुद्रिक म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी कार्यरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कळसुली मतदारसंघात पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली. काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. गावागावांत पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात काम करताना भविष्यात निश्चितच कळसुली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, असे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य प्रगती भोगले, पंच सदस्य चंद्रशेखर चव्हाण, सोसायटी संचालक बाबाजी मुरकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष भरत घाडीगावकर, किशोर घाडीगावकर, विभाग प्रमुख तातू गावकर, सुहास घाडीगावकर, बाळा नाईक, श्री. तावडे, सागर शिर्के, संजय गावकर, श्री. कदम, श्री. गुरव, श्री. वायंगणकर, बाबू घाडीगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80079 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top