संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat२३p१८.jpg
३७९९६
ः रत्नागिरी ः ग्रामदैवत श्री भैरीबुवाच्या ग्रामप्रदक्षिणेचे टिळकआळी येथे टिपलेले छायाचित्र. (छायाचित्र ः ओम स्टुडिओ, रत्नागिरी)
-------------
श्री भैरीची ग्रामप्रदक्षिणा उत्साहात
रत्नागिरी ः आषाढ महिन्यातील दुसऱ्या दशमीला शनिवारी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. आज सकाळी भैरी मंदिरातून वाजतगाजत भैरीबुवाची पालखी प्रदक्षिणेसाठी निघाली. यापूर्वी ९ जुलैला पहिल्या दशमीलासुद्धा पालखी ग्रामप्रदक्षिणा झाली होती. प्रथेप्रमाणे ही ग्रामप्रदक्षिणा उत्साहात व शांततेत निघाली. भैरी मंदिरातून निघालेली पालखी खालची आळी, मुरलीधर मंदिर, टिळक आळी, झाडगाव येथे पटवर्धन व सावंत खोत यांच्या घरी नेण्यात आली. नंतर जोशी पाळंदमार्गे झाडगाव, परटवणे येथे खंडकर यांच्या घरी बसून वरचा फगरवठार येथील सहाणेवर बसली. त्यानंतर फाटक हायस्कूल, गोखलेनाका, मारूती आळी, कोतवडेकर यांच्या सहाणेवरून पर्‍याची आळी, ढमालनीचा पार, विठ्ठल मंदिरमार्गे पुन्हा भैरी मंदिरात नेण्यात आली.
------------
at२३p१०.jpg
37975
ः आंबडवे ः संगणक कक्षाचे उद्घाटन करताना मान्यवर.
------------
आंबडवे कॉलेजात संगणक कक्षाचे उद्घाटन
मंडणगड ः विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बीएसआयटी विभागाच्या विस्तारित संगणक कक्षाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमास प्राचार्य अतिफ परकार, शिक्षक सय्यद हमीद आदी उपस्थित होते. याप्रसंगी परकार म्हणाले की, महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम हा आपल्याला आपले ध्येय, महत्वाकांक्षा याबाबत आत्मपरिक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, स्टार्टअप् आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. स्टार्टअप् आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. प्राध्यापक अरुण ढंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
------------
नवनिर्माणच्या सीबीएसई स्कूलचे यश
रत्नागिरी ः नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या रत्नागिरी नवनिर्माण हाय सीबीएसई स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. यावर्षी ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये ईशा जोशी हिने ९७ टक्के त्याचबरोबर इंग्लिश आणि सोशल सायन्समध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळवून स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. स्मिथ नाईक हिने ९४ टक्के गुणांनी उत्तीर्ण होत दुसरा क्रमांक तर श्रावणी महामुनी हिने ९३ टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, शाळेच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------
अभ्यंकर-कुलकर्णीमध्ये वाङमय मंडळाचे उद्घाटन
रत्नागिरी ः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये वाङमय मंडळाचे उदघाटन झाले. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, विज्ञानशाखेचे विभागप्रमुख प्रा. सुनील गोसावी व प्रा. सुषमा सावंत उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाङमय मंडळाद्वारे आयोजित सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
-----------------
-rat२३p२१.jpg
L38013
ः पावस ः रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील लक्ष्मी केशव विद्यालयमध्ये व्हॉलिबॉल स्पर्धेत खेळताना विद्यार्थी.
------------
लक्ष्मी केशव विद्यालयामध्ये स्पर्धा
पावस ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय दापोली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत श्री. लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप-फणसोप येथे व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या वर्गाचा समावेश होता. स्पर्धेमध्ये दहावी अ वर्गाने उत्कृष्ट खेळासह प्रथम क्रमांक पटकावला. दहावी ब वर्गाने द्वितीय क्रमांक पटकावला. या आधी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा साजरी केली होती. या स्पर्धा आयोजित करण्यासाठी फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नेत्रा राजेशिर्के, गणेश झोरे, प्रकाश पवार, संतोष डोळे व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेचे अध्यक्ष बबनराव साळवी यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये जिल्हा रत्नागिरी येथील डॉ. वैभव शिंदे, कृषिविद्यावेत्ता डॉ. सुनील घवाळे, संशोधन अधिकारी तसेच डॉ. संतोष वानखेडे, किटकशास्त्रज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80124 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top