बाळा गावडे अखेर शिवसेनेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळा गावडे अखेर शिवसेनेत
बाळा गावडे अखेर शिवसेनेत

बाळा गावडे अखेर शिवसेनेत

sakal_logo
By

38046
मुंबई ः बाळा गावडे यांचे स्वागत करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. शेजारी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदी.

बाळा गावडे अखेर शिवसेनेत

‘मातोश्री’वर शिवबंधन; काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा दिला होता राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. गावडे यांच्यासोबत काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते.
गावडे यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती, पंचायत समिती सभापती अशी पदे भूषविली होती. २०१४ मध्ये त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती; मात्र राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर गावडे हे काँग्रेसमध्येच राहिले होते. काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पद त्यांनी भूषविले.
वर्षभरापूर्वी त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पक्ष संघटना वाढविण्याबरोबरच विविध आंदोलने यशस्वी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते; मात्र काही कारणास्तव अलीकडे ते पक्षात नाराज होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांचे चिरंजीव कौस्तुभ गावडे यांनीही एनएसयूआय जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांच्या निकटवर्तीयांकडून याबाबत दुजोरा देण्यात आला होता; परंतु गावडे यांनी याबाबत कुठेही स्पष्टता केली नव्हती. आज अखेर त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांसमवेत ‘मातोश्री’वर जाऊन खासदार राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.
---
इतर कार्यकर्त्यांचाही समावेश
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवा सेनेचे गुणाजी गावडे आदी उपस्थित होते. तर प्रवेशकर्त्यांमध्ये कौस्तुभ गावडे, सच्चिदानंद बुगडे, संदीप कोठावळे, किरण गावडे, दोडामार्ग तालुक्यातून वैभव सुतार, अवी सावंत, शुभम धर्णे, राजन झोरे, सचिन धर्णे आदींनी प्रवेश केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80134 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..