चिपळूण-परशुराम घाटावर सीसीटीव्हीची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-परशुराम घाटावर सीसीटीव्हीची नजर
चिपळूण-परशुराम घाटावर सीसीटीव्हीची नजर

चिपळूण-परशुराम घाटावर सीसीटीव्हीची नजर

sakal_logo
By

RATCHL234.JPG
L38043
चिपळूणः परशुराम घाटात बसवलेले सीसीटिव्ही कॅमेरे.
--------------
परशुराम घाटावर सीसीटीव्हीची नजर
उच्च न्यायालयाचे आदेश ; सहा ठिकाणी बसवले कॅमेरे
चिपळूण, ता. २३ ः मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कंत्राटदार कंपन्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सहा दरडप्रवण क्षेत्रात बसवण्यात आलेल्या या कॅमेऱ्यामुळे कोसळणाऱ्या दरडींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
जुलै महिन्याच्या सुरवातीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात कोसळणाऱ्या दरडींमुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मध्यंतरी १० दिवस वाहतूक बंद ठेवून नंतर अवजड वाहनांसाठी नियम घालून एकेरी वाहतूक सध्या सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या घाटासह रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ७ जुलैला झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने परशुराम घाटाच्या रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून त्या माध्यमातून घाटावर वॉच ठेवा, अशी महत्वाची सूचना न्यायाधीश ए. के. मेनन आणि एम. एस. कर्णिक यांनी केली होती. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी दरडी कोसळण्याचा धोका असल्याने तेथे हॅलोजन फ्लड लाईटसह अन्य उपाययोजनाही सुचवल्या होत्या.
दरम्यान, न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार पेण आणि रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने आपापल्या दोन्ही कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यातूनच गुरुवारपासून सीसीटीव्हीही घाटात बसवण्यात आले आहेत. कल्याण टोलवेजकडून घाटातील वरच्या बाजूस चार ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात कॅमेरे बसवून तेथेच एका शेडमध्ये त्याचे नियंत्रण युनिट बसवण्यात आले आहे. तेथे २४ तास कर्मचारी लक्ष ठेवून आहे, तर ईगल इन्फ्राकडून दोन ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80143 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top