चिपळुणातील बॅनरबाजीपासून शिवसेना दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातील बॅनरबाजीपासून शिवसेना दूर
चिपळुणातील बॅनरबाजीपासून शिवसेना दूर

चिपळुणातील बॅनरबाजीपासून शिवसेना दूर

sakal_logo
By

RATCHL231.JPG
38016
चिपळूणः शहरात (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकूल शेजारी झळकलेला फलक.
----------------
चिपळुणातील बॅनरबाजीपासून शिवसेना दूर
बाळ कदम ; पूरग्रस्तांना मदत एकट्या शिंदेची नव्हे
चिपळूण, ता. २३ः गतवर्षी २२ जुलैला आलेल्या महापुरानंतर मदतीसाठी शिवसेनेसह दीडशेहून अधिक विविध धार्मिक व सेवाभावी संस्थांनी मोलाची मदत केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील महापुरानंतरची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लक्ष ठेवून होते. केवळ एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून चालणार नाही. शहरात झळकलेल्या बॅनरशी शिवसेनेचा काडीचा सबंध नाही. शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या भूमिकेबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असा खुलासावजा इशारा शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळ कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यापोटी झालेल्या बॅनरबाजीविषयी बाळा कदम म्हणाले, चिपळूणमध्ये गतवर्षी उद्भवलेल्या महापुरात एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी दिले किंवा अन्य जीवनावश्यक वस्तू व साहित्य दिले होते; परंतु ही मदत त्यांनी एकट्याने केली नव्हती. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार विनायक राऊत यांच्या सांगण्यानुसार मुंबई महानगरपालिकेने मदत केली. एवढेच नव्हे तर चिपळूणला अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी सहकार्य केले आहे. चिपळूण पालिकेच्या सफाई कामगारांचेही तितकेच योगदान आहे. या सर्वांचे ऋण फेडायला हवेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या विषयी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरले होते; परंतु त्या आधीच शहरप्रमुखांनी बॅनरबाजी केली. त्यावर शहरातील काही कार्यकर्त्यांसह सेना नेत्यांचे फोटो आहेत. या फलकाविषयी शिवसेनेचा काही संबंध नाही. त्यामुळे शिंदे यांना प्रमोट करणारा फलक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच काढला आहे. तो फलक काढण्याचे आदेश जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिले होते. फलकावर सेना नेत्यांचेही फोटो असल्याने शिवसैनिकांनी तो न फाडता सन्मानाने योग्यरित्या काढून ठेवला.

चौकट
सकपाळनी भूमिका जाहीरपणे घ्यावी
शहरप्रमुख उमेश सकपाळ अजूनही पदावर आहेत. ज्यांना जी भूमिका घ्यायची आहे ती जाहीरपणे घ्यावी. फलकबाजीतून शिवसेनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने हे फलक काढण्यात आले आहेत. उमेश सकपाळ यांना शिवसेनेत अजूनही संधी आहे, हे त्यांना कळलेले नाही. त्यामुळेच त्यांच्या या वर्तनाविषयी दखल घेण्यात आली असून, त्यावर पक्ष कार्यकारिणीची बैठक घेऊन जिल्हाप्रमुख सचिन कदम निर्णय देतील, असे बाळा कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80158 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top