चिपळूण शिवसेनेत फलकावरून संघर्षाची ठिणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण शिवसेनेत फलकावरून संघर्षाची ठिणगी
चिपळूण शिवसेनेत फलकावरून संघर्षाची ठिणगी

चिपळूण शिवसेनेत फलकावरून संघर्षाची ठिणगी

sakal_logo
By

RATCHL236.JPG
38057
चिपळूण ः खेडेकर क्रीडासंकूल परिसरात झळकलेल्या फलकास मिळालेले पोलिस सरंक्षण.
---------
चिपळूण शिवसेनेत फलकावरून संघर्षाची ठिणगी
हटवलेले पुन्हा लावले ; पालिकेमध्येही बराच खल
चिपळूण, ता. २३ः गतवर्षीच्या महापुरात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी त्यांच्यापोटी कृतज्ञता म्हणून फलक लावला. फलकाचा आशय न पटल्याने काही शिवसैनिकांनी शुक्रवारी सायंकाळीच फलक हटवला. सकपाळ यांनी पुन्हा त्याच ठिकाणी हा फलक उभारला आहे. जिल्हाप्रमुखांनी फलक काढण्याचे आदेश दिले असतानाही तो पुन्हा उभारला असल्याने चिपळूणच्या शिवसेनेत संघर्षाची ठिणगी पडली आहे.
गतवर्षीच्या महापुरानंतर विविध सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संघटनांसह विविध मंडळांसोबत ज्ञात-अज्ञात अशा हजारो राज्यातील, परराज्यातील लोकांनी आणि संघटनांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही चिपळूणच्या स्वच्छतेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आदी महापालिकांची अत्याधुनिक यंत्रणा व कर्मचाऱ्यांचे चमू पाठवले होते. महापुराच्या वर्षपूर्तीनिमित्ताने त्यांच्यापोटी कृतज्ञता म्हणून शहरप्रमुख सकपाळ यांनी फलक उभारला. त्यावर शिंदे यांचीच छबी मोठी असल्याने शिवसैनिकांनी आक्षेप घेत तो फलक काढला. यावरून वातावरण तंग झाले होते. हा फलक जिल्हाप्रमुखांनीच काढण्याचे आदेश दिल्याचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले. दरम्यान, फलक काढल्यानंतर तेथेच नवीन फलक तत्काळ लावल्याने शिवसेनेत संघर्षाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच एका पदाधिकाऱ्याच्या फार्महाउसवर झाली होती. तिथे राजकीय लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार का, याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
..........
चौकट
एकाची परवानगी, फलक अनेक
फलक उभारण्यासाठी सकपाळ यांनी पालिकेकडे रितसर परवानगी घेतली; मात्र त्यात फलक कुठे लावणार, याची स्पष्टता नसल्याने शनिवारी पालिकेत खल सुरू होता. फलकाचे ठिकाण दिल्यानंतर त्यावर पालिकेकडून पडदा पडला. एकाच फलकाची परवानगी घेतली असली तरी शहरात विविध ठिकाणी विविध आशयाचे फलक लागले होते. ते फलक काढण्याची सूचना केली असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले.
----------
चौकट
फलकासोबत पोलिस
शहरातील फलकबाजीमुळे वातावरण तापू नये यासाठी फलकाच्या ठिकाणी पोलिसांचे वारंवार लक्ष होते. काही काळ तिथे पोलिस तळ ठोकून होते. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा वॉच आहे. केवळ फलकास पोलिस संरक्षण दिले नसल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80174 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..