
अभ्यासक्रमात वाढ
आयआयटी मुंबईतील
अभ्यासक्रमात वाढ
मुंबई, ता. २३ : आयआयटी मुंबई प्रशासनाने आपल्याकडील विविध प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक आणि इतर शुल्कात तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक वाढ केली असल्याने त्याविरोधात वातावरण तापले आहे. आयआयटी प्रशासनाने ही शुल्कवाढ मागे घ्यावी म्हणून मागील पाच दिवसांपासून आयआयटी संकुलातील कानाकोपऱ्यात पावसात उभे राहून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाची दखल अजूनही प्रशासनाकडून घेतली गेली नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
आयआयटी मुंबईने २०१७ मध्ये अशाच प्रकारे शुल्कवाढ केली होती. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी अडीच महिने आंदोलन सुरू ठेवल्याने ती शुल्कवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली हेाती. मात्र, यंदा पुन्हा एकदा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खर्च वाढला असल्याचे कारण सांगत यंदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वसतीगृहासाठीच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80198 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..