रत्नागिरी-प्रतिज्ञापत्राद्वारे नऊ नगरसेवकांचा ठाकरेंना पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-प्रतिज्ञापत्राद्वारे नऊ नगरसेवकांचा ठाकरेंना पाठिंबा
रत्नागिरी-प्रतिज्ञापत्राद्वारे नऊ नगरसेवकांचा ठाकरेंना पाठिंबा

रत्नागिरी-प्रतिज्ञापत्राद्वारे नऊ नगरसेवकांचा ठाकरेंना पाठिंबा

sakal_logo
By

rat२४p१२.jpg
३८२३२
रत्नागिरी नगरपालिका
------------------
नऊ नगरसेवकांचा ठाकरेंना पाठिंबा
उपनेते राजन साळवी ; सामंत गटाबरोबर कोण तर्कवितर्कांना उधान
रत्नागिरी, ता. २४ ः शिवसेना नक्की कोणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा तिढा आता निवडणूक आयोगाकडे पोचला आहे. ठाकरे यांच्या आदेशावरुन पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जात असून रत्नागिरी शहरातील नऊ नगरसेवकांनी ती लिहून दिल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्यांपैकी शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदार उदय सामतांबरोबर कोण आहेत याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहे.
माजी खासदार अनंत गीते यांच्या दौऱ्याप्रसंगी शनिवारी (ता.२३) पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेनेकडून भरुन घेतल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्राबाबतची माहिती आमदार साळवी यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, रत्नागिरी पालिकेमध्ये मागील पाच वर्षांमध्ये ३० नगरसेवक निवडून गेले होते. त्यात १७ नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले होते. त्यातील नऊ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूण तीस नगरसेवकांमधील ५ जणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यातील चार जणं उदय सामंतांबरोबर गेले आणि एक अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. उर्वरित शिवसेनेच्या सतरापैकी बंटी कीर, बाबा नागवेकर, मिरा पिलणकर, रशिदा गोदड, फराह पावसकर, मधुकर घोसाळे यांच्यासह नऊ जणांचा सेनेला पाठिंबा आहे. या नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्र लिहून देत आम्ही ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगितले आहे. सध्या माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली आहे.
दरम्यान, शिवसेनेत ताकद दाखवून देण्यासाठीची जोरदार लढाई सुरू झाली आहे. सामंतांकडे जाणाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला तर काहींची पदावरुन हकालपट्टी केली गेली. त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या होत आहेत. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या आमदार उदय सामंत यांच्या स्वागताला एकोणीस नगरसेवकांनी भेटी दिल्याची माहिती पुढे आली आहे. आता शिवसेनेचे उपनेत राजन साळवी यांनी थेट नऊ जणांची यादीच तयार करत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यामुळे सामंतांची पुढील भूमिका काय राहणार याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत. सामंत यांनी शिवसेनेत आल्यानंतर मागील काही वर्षात सेनेच्या बहुतांश लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पाठबळ दिले होते. त्यामुळे त्यांची वैयक्तिक ताकदही तेवढीच आहे. हीच मंडळी आमदार सामंत यांना निवडणार की शिवसेना पक्ष याकडे लक्ष लागले आहे.

कोट
रत्नागिरीतील नऊ नगरसेवकांनी प्रतिज्ञा पत्र लिहून देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
- डॉ. राजन साळवी, आमदार, उपनेते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80351 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..