दापोलीत भटक्या कुत्र्यांचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीत भटक्या कुत्र्यांचा वावर
दापोलीत भटक्या कुत्र्यांचा वावर

दापोलीत भटक्या कुत्र्यांचा वावर

sakal_logo
By

दापोलीत भटक्या
कुत्र्यांचा वावर
दाभोळः दापोली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर पुन्हा वाढू लागला आहे. बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठराव दापोली नगरपंचायतीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला होता; मात्र अद्याप निर्बिजीकरण सुरू झाले नसल्याचे समोर आले आहे. त्याकरिता पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे चर्चा झाली असून लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होईल, अशी अपेक्षा दापोलीकरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
-------------
पर्यटकांना भावते
मिनी महाबळेश्‍वर
दाभोळ ः मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळख असणाऱ्या दापोली तालुक्यामध्ये उन्हाळी हंगामात ७० ते ८० टक्के पर्यटकांनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील मुरूड, कर्दे, लाडघर, पाळंदे, आंजर्ले या ठिकाणी पर्यटक अधिक पसंती देतात तर मासळीसाठी हर्णै बंदर येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. कोकणात येणारा पर्यटक हा मासळी खाण्यासाठी खास येतो. कधी पर्यटक स्वतः बंदरावर जाऊन मासळी खरेदी करतात तर काहीवेळा हॉटेल व्यावसायिक मासळी उपलब्ध करून देतात. मासळी उपलब्ध न झाल्यास चिकन खावे लागते. तसे पाहिले तर हॉटेल, मासळी, चिकन, मटण विक्री तसेच इतर खाद्यपदार्थ यांचा विचार केला तर करोडोंची उलाढाल दापोलीत होते. यावर्षी पावसाळ्यातदेखील काही पर्यटक सहलीसाठी येत आहेत. कोकणातील हिरवळ आकर्षित करत असल्याचे पावसाळ्यात पर्यटनासाठी आलेल्यांचे मत आहे; परंतु मासळी मिळत नाही. तसेच समुद्रात पोहण्यासाठी जाता येत नाही; मात्र हॉटेलमध्ये स्विमिंग पूल उपलब्ध असते तर अजून सहलींची संख्या वाढण्यास मदत होईल. यावर्षी पावसाळ्यापूर्वी सुरवातीला पर्यटकांची संख्या कमी होती; परंतु १५ मे ते १५ जून या कालावधीत पर्यटकांची संख्या वाढल्याचे व ७० ते ८० टक्के पर्यटन यावर्षी दापोलीत झाल्याचे लाडघर येथील हॉटेल व्यावसायिक नरेश पेडणेकर यांनी सांगितले.
---------------------
३०० कुटुंबांना
दिली कलमे
दाभोळ ः ओणनवसे गावातील ३०० कुटुंबांना प्रत्येकी ५ कोकम रोपे, २ काळीमिरी कलमे नुकतीच लागवडीसाठी मोफत पुरवण्यात आली. या कार्यक्रमासाठी १ हजार ५०० कोकम रोपे दापोली कुणबी सेवा संघांतर्गत नवभारत छात्रालय परिवाराने, तर ६०० काळीमिरी कलमे अश्विनी अॅग्रो फार्मर्सच्या प्रभाकर शिंदे यांनी मोफत उपलब्ध करून दिली. कलमे, रोपे वाटप कार्यक्रम डॉ. प्रमोद सावंत व डॉ. प्रवीण झगडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी आयोजित केला होता. या रोपांचे नियोजनबद्ध वाटप सरपंच आदावडे यांनी केले. या वेळी कोकम व काळीमिरी लागवडीची ग्रामस्थांना माहितीदेखील देण्यात आली.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80355 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top