
पोखरण हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन
L38279
पोखरण ः रानभाज्या प्रदर्शनात सहभागी कृषिकन्यांसह हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी.
पोखरण हायस्कूलमध्ये
रानभाज्यांचे प्रदर्शन
ओरोस, ता. २४ ः कुडाळ तालुक्यातील पोखरण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी भरविलेल्या रानभाज्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात कोकणातील रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. यावेळी हरितगृह आणि फूड पिरॅमिडद्वारे प्रदर्शनात सहभागी व्यक्तींना भाज्यांचे महत्त्व विशद करण्यात आले. विशेष म्हणजे विविध भाज्यांच्या बियासुद्धा प्रदर्शनात ठेवत भाज्यांच्या बियांची ओळख करून देण्यात आली. कुडाळकर हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या श्रीदेवी मेनन, चैताली प्रभू, अमृता पाटील, अपेक्षा देसाई, ऋग्वेदा जेऊघाले यांनी हे प्रदर्शन शनिवारी (ता. २३) भरविले होते. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य एस. पी. सामंत, कार्यक्रम समन्वयक एन. ए. साहिल, सहाय्यक कार्यक्रम समन्वयक ए. टी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जी. डी. गायकी, एस. बांबुळकर, चेतन परब, प्रशालेचे मुख्याध्यापक पी. एन. घाडीगावकर, शिक्षक विवेक कळसुलकर, जितेंद्र महाभोज, संजय तळवडेकर, स्मृती बालम आदी शिक्षकांसह हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये पारंपरिक कृषी उपकरणे, आधुनिक कृषी उपकरणे, हरितगृह प्रतिकृती व माहिती फलक, भात, कडधान्य, औषधी वनस्पतींची बियाणे, पौष्टिक अन्न पिरॅमिड फलक आदी माहिती मांडण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना फायदेशीर कीटकांबद्दल माहिती देऊन जागृती करण्यात आली. यात फणस, हळदीची पाने, टायकुळा, अळू, शेवग्याचा पाला, लाल भाजी आदी भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. कृषिकन्यांनी रानभाज्यांचे महत्त्व व या भाज्या खाल्ल्याने मिळणारे पोषक घटक याची माहिती दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80361 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..