फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L38247

शिडवणे ः शिक्षण परिषदेत सुहास पाताडे यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र ः एन. पावसकर)

शिडवणे नं. १ शाळेत
शिक्षण परिषद उत्साहात
तळेरे ः शेर्पे व खारेपाटण केंद्रांची नवीन शैक्षणिक वर्षातील पहिली संयुक्त शिक्षण परिषद शिडवणे नं. १ शाळेत झाली. यावेळी शासनाच्या विविध ऑनलाईन कामकाजाचे प्रत्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे, शेर्पे व खारेपाटण केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार, साळिस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ कापसे व प्रशांत सर्पे, खारेपाटण केंद्र मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, शेर्पे केंद्र मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, खारेपाटण उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रुबाब फकीर व दोन्ही केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केले. श्री. पाताडे यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निश्चिती कार्यक्रम अंतर्गत माहिती खारेपाटण नं. १ शाळेच्या उपशिक्षिका लांघी यांनी दिली. खारेपाटण-काझीवाडा शाळेचे उपशिक्षक इरफान सारंग यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाविषयी माहिती दिली. शिडवणे शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी विद्यांजली पोर्टलवर लॉगिन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. विषयतज्ज्ञ कापसे यांनी दिव्यांग प्रकार आणि त्यांची अध्ययनशैली याविषयी माहिती दिली. केंद्रप्रमुख कुबल यांनी केंद्रस्तरीय प्रशासकीय बाबींची माहिती दिली. शिडवणे शाळेचे मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी आभार मानले.
...............
L38248

बांदा ः आधारकार्ड नोंदणी शिबिरासाठी उपस्थित मान्यवर व पालक.

बांद्यात आधारकार्ड नोंदणी
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा ः बांदा प्रभागातील ० ते ५ वयोगटातील अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आधारकार्ड नोंदणी शिबिराचा शुभारंभ आज बांदा ग्रामपंचायत सभागृहात सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते झाला. यावेळी पहिल्या दिवशी ५० हुन अधिक बालकांची आधारकार्ड नोंदणी करण्यात आली.
यावेळी बांदा पोस्टमास्तर रुपा किनळेकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका सिंधू पवार, ''सकाळ''चे येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग पोस्ट कार्यालय यांच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्प अधिकारी सावंतवाडी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. उद्या (ता. २५) बांदा ग्रामपंचायत कार्यालय, २६ ला विलवडे ग्रामपंचायत कार्यालय, २७ ला डेगवे, २८ ला इन्सुली, २९ ला शेर्ले, ३० ला मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात आधारकार्ड नोंदणी शिबिर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. यावेळी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, कामिनी कुडव, अर्चना आंबेलकर, देवयानी डेगवेकर, मानसी बांदेकर, किरण गावडे, रतन मोर्ये, चारुशिला परब, क्षमता सातार्डेकर, मदतनीस गीतांजली सावंत, संचिता मंजिरकर, अनघा सावंत, मैथिली सावंत, वैष्णवी सातोस्कर, तनुजा देसाई, शुभांगी शिरोडकर, अक्षता सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80363 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top