देवरुखला क्रांतीदिनी मॅरेथॉन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुखला क्रांतीदिनी मॅरेथॉन स्पर्धा
देवरुखला क्रांतीदिनी मॅरेथॉन स्पर्धा

देवरुखला क्रांतीदिनी मॅरेथॉन स्पर्धा

sakal_logo
By

देवरुखला क्रांतीदिनी मॅरेथॉन स्पर्धा
साडवली, ता. 24 : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवरूख येथील आकार ऑर्गनायझेशन क्रीडा विभागातर्फे रन तिरंगा ही थीम घेवून क्रांतीदिनी (ता. 9 ऑगस्ट) मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला देवरूख नगरपंचायतीचे सहकार्य लाभणार आहे.
प्रसिद्घ उद्योजक (कै.) बाळासाहेब व विमलताई पित्रे यांच्या प्रेरणेने गेली अनेक वर्ष ही स्पर्धा घेतली जाते. रन तिरंगा या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांचा एक गट, मुलींचा एक गट, महिलांचा एक गट व खुला गट असे स्वरुप आहे. सहभाग प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे. छ. शिवाजी चौक येथून ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनाही संधी दिली जाणार आहे. ही विशेष दौड असणार आहे. तीन गटासाठी छ. शिवाजी चौक, महाडीक स्टॉप, सह्याद्रीनगर, सावरकर चौक, ग्रामीण रुग्णालय, स्टेट बॅंक रोड ते शिवाजी चौक असा मार्ग असणार आहे. खुल्या गटासाठी शिवाजी चौक, सह्याद्रीनगर, सावरकर चौक, कांजीवरा, सोळजाई मंदिर, माणिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग असणार आहे.
----------
-rat24p20.jpg-
38266
चैतन्या तेंडोलकर, अक्षता भाट्ये, किरण टक्के

सामान्यज्ञान स्पर्धेत चैतन्या, अक्षता प्रथम
साडवली ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयोजित आकांक्षा या वार्षिक अंकावर आधारित सामान्यज्ञान चाचणी (प्रश्नमंजूषा स्पर्धा) स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेष अंकात गाऊ त्यांना आरती या सदरात स्वातंत्र्योत्तर भारतात निरनिराळ्या क्षेत्रात उच्चपदी पोहोचलेल्या 75 स्त्री-पुरुषांच्या चरित्रावर आधारित ही सामान्यज्ञान चाचणी होती. सामान्यज्ञान चाचणीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये चैतन्या तेंडोलकर आणि अक्षता भाट्ये या दोघींना विभागून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक किरण टक्के आणि तृतीय क्रमांक अनुराधा भुरवणे, साक्षी कांबळे, काजल गवळी आणि प्रणिता चौधरी या चौघींना विभागून देण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा कोरे, प्रा. मंजुश्री भागवत, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, अक्षय भुवड यांनी मेहनत घेतली.
.......

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80390 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top