
चिपळूण-घरडा कंपनीतर्फे पंधरा गावातील 400 विद्यार्थ्यांना वह्या
rat२४p२१.jpg-
L38321
खेडः शालेय विद्यार्थ्यांना घरडा कंपनीतर्फे मोफत वह्यांचे वाटप करताना सूरज रेवणे व पदाधिकारी.
----------
घरडा कंपनीतर्फे पंधरागावातील
४०० विद्यार्थ्यांना वह्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : खेड तालुक्यातील पंधरागाव विभागातील साखर माध्यामिक विद्यालय साखर येथे पंधरागाव विभागातील चारशे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सूरज संजय रेवणे यांच्या पुढाकाराने लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष संतोष घोरपडे आणि श्री. बापट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी साखर माध्यमिक विद्यालय साखर, शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे, तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा साखर चौकीचीवाडी, साखर नंबर १, साखर नंबर २, पोसरे तांबड, पोसरे राववाडी, पोसरे खुर्द, निवे, चोरवणे नंबर १,चोरवणे डोंगर, चोरवणे जखमेचीवाडी आदी जि.प.प्राथमिक शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षण संस्थेचे सचिव संदीप म्हापदी, शाखाप्रमुख शिवाजी उतेकर, मेजर विजय जाधव, सुभाष चव्हाण, किशोर उतेकर, विश्वास मोरे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80402 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..