खेड-किल्ले महिपतगडावर दुर्गवरील प्रतिष्ठानचे श्रमदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-किल्ले महिपतगडावर दुर्गवरील प्रतिष्ठानचे श्रमदान
खेड-किल्ले महिपतगडावर दुर्गवरील प्रतिष्ठानचे श्रमदान

खेड-किल्ले महिपतगडावर दुर्गवरील प्रतिष्ठानचे श्रमदान

sakal_logo
By

किल्ले महिपतगडावर
दुर्गवीर प्रतिष्ठानचे श्रमदान
खेड, ता. २४ : तालुक्यातील किल्ले महिपतगड (वाडी बेलदार) येथे दुर्गवीर प्रतिष्ठानने श्रमदान मोहिम राबवली. तालुक्यातील दुर्गम भागातील गड संवर्धनासाठी शनिवारी (ता. २३) दुपारी ४ वाजता कार्यकर्ते महिपतगडाच्या दिशेने निघाले. मुसळधार पाऊस, खडतर रस्ता आणि रस्त्यावर पडलेल्या दरडी बाजूला करत या दुर्गवीर सदस्य रात्री ८ वाजता गडावर पोहोचले. पारेश्वर मंदिरामागे असलेल्या वाड्याच्या जोत्याच्या बाहेरील बाजूस कित्येक वर्षांपासून दगड मातीचा जो थर पडलेला होता, तो बाजूला करून दगड आणि मातीचे वर्गीकरण करून ठेवण्यात आले. १० दुर्गवीर सदस्यांनी ही श्रमदान मोहीम यशस्वी केली. जीवन सैतवडेकर, रोहित बालडे, राकेश इंदुलकर, मंदार दिवेकर,स्वप्नील गायकवाड, प्रथमेश सावंत, प्रसाद घाणेकर, सुनील शिंदे, ऋषिकेश निकम, सागर गुजर यांचा सहभाग होता. या मोहिमेसाठी ग्रुप ग्रामपंचायत मांडवेच्या सरपंच सौ. कासार, वाडी बेलदारचे पोलिस पाटील डी. एस. जाधव, मनोहर पवार आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80419 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..