पावस-मेर्वी ग्रामस्थांना हवी वस्तीची एसटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-मेर्वी ग्रामस्थांना हवी वस्तीची एसटी
पावस-मेर्वी ग्रामस्थांना हवी वस्तीची एसटी

पावस-मेर्वी ग्रामस्थांना हवी वस्तीची एसटी

sakal_logo
By

मेर्वी ग्रामस्थांना हवी वस्तीची एसटी
ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची गैरसोय ; आगारप्रमुखांना निवेदन
पावस, ता. २४ ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावामध्ये रस्त्याची सोय असूनही वस्तीची एसटी बस नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गावात तातडीने वस्तीची गाडी सुरू करावी, असे निवेदन पालकांनी रत्नागिरी आगरप्रमुखांना दिले आहे
रत्नागिरी-पावस सागरी मार्गावर मेर्वी गाव असले तरी गावची लोकसंख्या महामार्गापासून बरीच आतमध्ये आहे. या भागामध्ये ३० ते ३५ वर्षांपूर्वी चांगला रस्ता आहे. मात्र तरीही एसटीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना चालत मुख्य रस्त्यावर यावे लागते. रात्री अपरात्री जंगल परिसर असल्याने ये-जा करणे कठीण होते. शिक्षणासाठी येथील ३० ते ३५ विद्यार्थ्यांना दररोज पावस विद्यामंदिरमध्ये यावे लागते. सकाळी ९ आणि सायंकाळी पाच वाजता या गावात एसटी जाते. सायंकाळी पाच नंतर एसटीने नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होते. त्यामुळे रात्री पावणेआठ वाजता रत्नागिरी ते मेर्वी अशी वस्तीची गाडी सोडावी. तीच गाडी सकाळी साडेसहा वाजता मेर्वी ते रत्नागिरी अशी सोडावी. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते हेमनाथ खरडे व माजी सरपंच जानवी खरडे यांच्या उपस्थितीत पालक व विद्यार्थी यांनी आगरप्रमुखांना दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80436 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..